कमी दराच्या निविदेचा प्रश्न गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 10:45 PM2018-07-10T22:45:16+5:302018-07-10T22:47:14+5:30

नाशिक : कमी दराच्या निविदा दाखल करून ठेकेदाराला कामे करणे कसे परवडते, असा सवाल उपस्थित करून कामाची गुणवत्ता तपासल्याशिवाय ठेकेदाराला अनामत रक्कम परत करण्याचा प्रकार चुकीचा असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला. संबंधित अभियंता सदस्यांचे हक्क डावलून परस्पर अनामत रक्कम परत करत असेल तर त्यांच्याकडूनच वसुली करण्यात यावी, अशी जोरदार मागणी सदस्यांनी केली.

The problem of low tariff issue is gone | कमी दराच्या निविदेचा प्रश्न गाजला

कमी दराच्या निविदेचा प्रश्न गाजला

Next
ठळक मुद्दे जिल्हा परिषद : सदस्यांच्या पत्राशिवाय अनामत देऊ नये

नाशिक : कमी दराच्या निविदा दाखल करून ठेकेदाराला कामे करणे कसे परवडते, असा सवाल उपस्थित करून कामाची गुणवत्ता तपासल्याशिवाय ठेकेदाराला अनामत रक्कम परत करण्याचा प्रकार चुकीचा असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला. संबंधित अभियंता सदस्यांचे हक्क डावलून परस्पर अनामत रक्कम परत करत असेल तर त्यांच्याकडूनच वसुली करण्यात यावी, अशी जोरदार मागणी सदस्यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठेकेदारांच्या कामाचा दर्जा आणि अनामत रकमेचा विषय चांगलाच गाजला. सदस्यांचे लेखी पत्र असल्याशिवाय ठेकेदाराची अनामत रक्कम कशी परत केली जाते याचा जाब आत्माराम कुंभार्डे, संजय बनकर, महेंद्रकुमार काले आणि धनराज महाले यांनी उपस्थित केला. ठेकेदाराकडून कामे पूर्ण होत नसतानाही त्याला अनामत रक्कम दिली जाते. विशेष म्हणजे मुदतवाढ न घेताही ठेकेदारांची कामे सुरूच असतात याकडेही कुंभार्डे यांनी लक्ष वेधले.
वास्तविक ठेकेदाराने केलेल्या कामाची गुणवत्ता मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तपासणे अपेक्षित असताना या अधिकाऱ्यांनी कोणती भूमिका घेतली, असा सवाल कुंभार्डे यांनी उपस्थित केला.
ठेकेदार कधी काम करतात आणि कधी त्यांना अनामत रक्कम मिळते याचा पत्ताच लागत नसल्याचा मुद्दा नांदगाव पंचायत समितीचे प्रभारी सभापती सुभाष कुटे यांनी उपस्थित केला. सदस्यांच्या गटात कोणती कामे सुरू आहेत याची माहितीच सदस्याला नसते, काम कधी सुरू होते आणि पूर्ण कधी होते याचा थांगपत्ता लागतच नाही.
ई-टेंडरिंग झाल्यापासून तर ठेकेदारही सदस्यांना विचारत नसल्याची भावना व्यक्त करताना निदान सदस्यांच्या पत्राशिवाय अनामत परत करू नये, सदस्याला पत्राचा तरी मान मिळावा, अशी उपरोधिक मागणी त्यांनी नोंदविली.
सदस्यांच्या पत्राशिवाय ठेकेदाराला अनामत रक्कम परत करणाºया अभियंत्यांकडून वसुली केली जावी, अशी सूचना संजय वनारसे यांनी मांडली.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लांडगे यांनी कामाची गुणवत्ता पाहूनच कारवाई केली जाईल, असे सभागृहाला सांगितले. गुणवत्ता न तपासताच अनामत रक्कम परत केली तर संबंधित अधिकाºयाला जबाबदार धरले जाईल, असे अध्यक्षांनी सुनावले.कमी दराने काम परवडते कसे
च्कमी दराने निविदा भरूनही ठेकेदारांना कामे करणे कसे परवडते याचे एकदा अवलोकन केले पाहिजे, असा मुद्दा कुंभार्डे यांनी उपस्थित करतानाच यापुढील काळात कमी दराच्या निविदा भरणाºयांनाच अपात्र करण्यात यावे, अशी मागणी केली. कमी दराच्या निविदांनी काम करणाºया ठेकेदाराच्या कामाचा दर्जा कसा निश्चित करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. किती कमी दराचे टेंडर आहे याची मागणी प्रशासन विभागाकडे केलेली असून, अजूनही उत्तर मिळाले नसल्याचे सांगितले.

Web Title: The problem of low tariff issue is gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.