येवल्यात ऑक्सीजन तुटवड्याचा प्रश्न कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:19 PM2021-05-11T16:19:06+5:302021-05-11T16:20:15+5:30
येवला : शहरातील खाजगी रूग्णालयांसह उपजिल्हा रूग्णालय आणि नगरसुल ग्रामीण रूग्णालयाला ऑक्सीजन तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे.
येवला : शहरातील खाजगी रूग्णालयांसह उपजिल्हा रूग्णालय आणि नगरसुल ग्रामीण रूग्णालयाला ऑक्सीजन तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख सहा खाजगी रूग्णालयांमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार केले जात असून उपजिल्हा रूग्णालयासह नगरसुल ग्रामीण रूग्णालयात डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर करण्यात आले आहे. परिणामी ऑक्सीजनची मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत ऑक्सीजन उपलब्ध होत नसल्याने रूग्णालयांनी बेड क्षमता असतांनाही क्षमतेपेक्षा कमी बेड सुरू ठेवले आहेत. परिणामी रूग्णांची गैरसोय होते आहे.
उपजिल्हा रूग्णालयाची ६७ बेडस्ची क्षमता असतांना ऑक्सीजन तुटवड्यामुळे ४३ बेडस सुरू ठेवण्यात आले आहे तर नगरसुल येथील ग्रामीण रूग्णालयाची ३० बेडस्ची क्षमता असतांना २५ बेडस सुरू ठेवण्यात आले आहेत. उपजिल्हा रूग्णालय येथे ऑक्सीजन प्लांट मंजूर झालेला असून तो कार्यान्वीत होण्यासाठी अवधी जाणार आहे. तर नगरसुल ग्रामीण रूग्णालयासाठी किमान जादा ऑक्सीजन सिलेंडर देणे तातडीचे बनले आहे.
नगरसुल ग्रामीण रूग्णालयात सद्यस्थितीला २ वैद्यकीय अधिकारी, २ डाटा एंट्री ऑपरेटर, १ औषध निर्माण अधिकारी, २ वार्ड बॉय, सफाई कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे आहे त्या कर्मचार्यांवर कामाचा ताण पडतो आहे. सदर पदे तातडीने भरण्याची मागणी केली जात आहे.
(११ येवला)