पांडवनगरी परिसरातील प्रश्न सुटला : नवीन जलकुंभातून पुरवठा सुरू बारा वर्षांचा पाण्याचा वनवास संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:42 AM2018-05-11T01:42:08+5:302018-05-11T01:42:08+5:30
इंदिरानगर : सुमारे बारा वर्षांपासून पांडवनगरी परिसराला कृत्रिम पाणीटंचाई भेडसावत होती. अखेर येथे नवीन जलकुंभ बांधून तेथून पाणीपुरवठा सुरू झाल्याने परिसरातील पाणीप्रश्न सुटला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
इंदिरानगर : सुमारे बारा वर्षांपासून पांडवनगरी परिसराला कृत्रिम पाणीटंचाई भेडसावत होती. अखेर येथे नवीन जलकुंभ बांधून तेथून पाणीपुरवठा सुरू झाल्याने परिसरातील पाणीप्रश्न सुटला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पांडवनगरी परिसरात सुमारे पंधरा वर्षांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष सवलतीतून सदनिका बांधण्यात आल्या आहेत. अडीच हजार सदनिकांकधून शेकडोच्या संख्येने नागरिक वास्तव्य करतात. परिसरात दिवसागणिक अपार्टमेंट आणि सोसायट्या वाढत गेल्याने या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने परिसरात होणारा पाणीपुरवठा कमी पडत होता. त्यामुळे परिसरात बारा वर्षांपासून अत्यंत कमी दाबाने होणाºया पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना नेहमीच कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत होते. त्यातच दरवर्षी उन्हाळ्यात तर परिसरातील नागरिक स्वखर्चाने टँकरने पाणी मिळवत. काही वेळा मनपाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात असे. तळपत्या उन्हात महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. अनेक वेळेस मनपा प्रशासनास निवेदन देऊन आणि आंदोलन करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नव्हता. अखेर सुमारे एक वर्षापूर्वी पांडवनगरी परिसरासाठी स्वतंत्र वीस लाख लिटर जलक्षमता असलेल्या जलकुंभाचे काम सुरू करण्यात आले. त्या जलकुंभाचे काम पूर्ण झाल्याने तातडीने नवीन जलकुंभातून परिसरात पाणीपुरवठा सुरू करावा यासाठी प्रभाग नगरसेवकांनी आयुक्त आणि महापौरांना भेटून मागणी केली होती. त्याची दखल घेत अखेर बुधवारी (दि. ९) सायंकाळी ५ वाजता मनपा पाणीपुरवठा अधिकाºयांनी मुबलक पाणी सोडून नागरिकांना सुखद धक्का दिला. या नवीन जलकुंभातून पांडवनगरी ते श्रद्धाविहार कॉलनीदरम्यान येत असलेल्या विविध कॉलनी आणि सोसायट्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे बारा वर्षांपासूनचा कृत्रिम पाणीटंचाईचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सुरळीत पुरवठा व्हावा
श्रद्धाविहार कॉलनीसह परिसरातील कृत्रिम पाणीटंचाईस जनता त्रस्त झाली होती. प्रभाग नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, अॅड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे यांनी होळी सणाच्या दिवशी पाणीपुरवठा अधिकाºयांना घेराव घालून बोंबाबोंब आंदोलन केले होते. या नवीन जलकुंभामुळे पांडवनगरी परिसरातील हजारोंच्या संख्येने राहणाºया नागरिकांचा पाणीप्रश्न सुटला आहे. आता जलकुंभ नियमित भरला जाऊन पाणीपुरवठा सुरळीत राहील हे पाहणेही महत्त्वाचे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे