मालेगावातील ब्रिटिशकालीन पोलिस वसाहतीला समस्याचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 04:24 PM2020-09-10T16:24:47+5:302020-09-10T16:26:40+5:30
मालेगाव कॅम्प : येथील कॅम्प रस्त्यावरील दत्त मंदिर समोरील १२ खोल्यांची ब्रिटीश कालीन पोलीस वसाहत मोठ्या समस्यांच्या सामना करीत आहे तर येथील कर्मचारी अन्य वसाहतीत स्थलांतर होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. या वसाहतीत अनेक समस्या असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मालेगाव कॅम्प : येथील कॅम्प रस्त्यावरील दत्त मंदिर समोरील १२ खोल्यांची ब्रिटीश कालीन पोलीस वसाहत मोठ्या समस्यांच्या सामना करीत आहे तर येथील कर्मचारी अन्य वसाहतीत स्थलांतर होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. या वसाहतीत अनेक समस्या असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. कॅम्पात हिंमतनगर पोलीस या मुख्य वसाहतीसह अन्य काही पोलीस स्थानकांच्या परिसरात कर्मचाऱ्यांचे वास्तव्य आहेत. या सर्वात जुनी शंभर वर्षाहून अधिक ब्रिटीश कालीन कॅम्प रस्त्यावरील वसाहत आहे. अगदी जुनाट बांधकाम एक दीड फुट जाडीच्या दगडी भिंती, सिमेंट पत्रे असे बांधकाम आहे. त्यामुळे या प्रत्येकी तीन खोल्यांची वसाहत आहे. येथे रहिवासी पोलीस कर्मचाºयांना खोलीचे नूतनीकरण करता येत नाही. या वसाहतीमध्ये मुख्य गटारींचा प्रश्न मोठा आहे. मागील बाजूस गटार आहे. परंतु ती गटार वसाहती पुरती आहे. पुढे गटार मोठ्या भूखंडांमध्ये बंद झाली आहे. त्यामुळे दूषित पाण्याची समस्या निर्माण होते. येथील स्वच्छता गृहे जुनी पद्धतीची आहे. त्याची देखभाल कर्मचाºयांना करावी लागते. वसाहती समोर एफसीआयचे धान्य गोदाम आहे. या गोदामाच्या सडलेल्या धान्याचा वासांचा त्रास वसाहतीस होत आहे तर वसाहती मागे स्वच्छतागृहाजवळ मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहे. ही डोकेदुखी ठरत आहे. धान्य गुदामासमोर असल्याने येथे घुसी, उंदरांचा प्रादुर्भाव होतो. मालेगावी पोलीस कर्मचाºयांसाठी चर्च परिसरात मोठ्या इमारतींचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर येथील कर्मचारी नवीन जागेत स्थलांतर होऊ शकतात, असे एका कर्मचाºयांनी सांगितले. तोपर्यंत या विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार असल्याचे कर्मचारी सांगतात.