भरवीर खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेचा प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:20 AM2020-12-05T04:20:01+5:302020-12-05T04:20:01+5:30
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून एचएएल कंपनीच्या वतीने सिव्हिल डेप्युटी मॅनेजर सुनील सहाणे, सिव्हिल असिस्टंट सुपरवायझर वानखेडे, काॅन्ट्रॅक्टर संदीप ...
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून एचएएल कंपनीच्या वतीने सिव्हिल डेप्युटी मॅनेजर सुनील सहाणे, सिव्हिल असिस्टंट सुपरवायझर वानखेडे, काॅन्ट्रॅक्टर संदीप खैरनार, पंचायत समिती उपसभापती विमलताई गाढवे, इगतपुरी पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी, सरपंच अश्विनी भोईर, विस्ताराधिकारी मोरे, बालभैरवनाथ फाउण्डेशनचे अध्यक्ष शिक्षक तुकाराम सारुक्ते, ग्रामपंचायत सदस्य सोपान घोरपडे, माजी सरपंच दत्तू जुंद्रे, शिक्षक विनायक पानसरे, सामाजिक कार्येकर्ते संपत रोंगटे, शिक्षक ज्ञानेश्वर भोईर, भाऊराव रोंगटे, ससाणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण टोचे, पोलीसपाटील रमेश टोचे, सर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामसेवक किशोर दळवे, शिक्षक पांडुरंग आंबेकर, सुमन क्षीरसागर, निर्मला दिघे, कल्पना खैरनार, कुंदा फणसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. शिक्षिका वैशाली वालझाडे यांनी सूत्रसंचालन केले, तर शिक्षक खैरनार यांनी आभार मानले.
---------------------------------------------------------
इन्फो
टोचे यांचे दातृत्व
माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असताना मराठी शाळेतच शिक्षण घेण्याचेदेखील आवाहन केले तसेच मंदिर बांधण्यात आपण सहकार्य करतात तसेच शाळेसाठीही मदत करा व सहकार्य करा. त्यातून मुलांची प्रगती साधा व देश घडवा. हे प्रेरणादायी भाषण ऐकून गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ विठ्ठल बबन टोचे यांनी शाळेसाठी ५१ हजार रुपयांची मदत जाहीर केली.
कोट....
जिल्हा परिषद शाळा नवीन इमारतीसाठी याआधी काही संस्थांकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता; परंतु यश आले नाही. नंतर एचएएल कंपनीच्या माध्यमातून यश प्राप्त झाले. मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेची आज मोठ्या दिमाखात इमारत उभी राहिल्याने स्वप्न पूर्ण होत असल्याचा नक्कीच आनंद होत आहे.
- तुकाराम सारुक्ते, शिक्षक
----------------------
छायाचित्र--- ०४ भरवीर स्कूल
शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करताना माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर. समवेत उपसभापती विमल गाढवे, सरपंच अश्विनी भोईर, ज्ञानेश्वर भोईर, तुकाराम सारुक्ते, संपत रोंगटे, भाऊराव रोंगटेंसह ग्रामस्थ.
===Photopath===
041220\04nsk_17_04122020_13.jpg
===Caption===
शाळेच्या नवीन इमारतीचे भुमिपुजन करताना माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर. समवेत उपसभापती विमल गाढवे, सरपंच अश्वीनी भोईर, ज्ञानेश्वर भोईर,तुकाराम सारुक्ते,संपत रोंगटे, भाऊराव रोंगटे सह ग्रामस्थ.