थेट खरेदीला मूल्यांकनाची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:06 AM2017-08-18T00:06:42+5:302017-08-18T00:09:15+5:30

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी सिन्नर तालुक्यातील सव्वादोनशे शेतकºयांनी थेट खरेदीने जागा देण्याची तयारी दर्शविली असली तरी, महामार्गासाठी जागा जाणाºया शेतकºयांच्या गटातील अन्य मालमत्तेचे मूल्यांकन करण्यात शासकीय यंत्रणांनी वेळकाढूपणा अवलंबिल्याने खरेदीत अडचणी निर्माण झाल्या असून, त्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. समृद्धी महामार्गासाठी जिल्हा प्रशासनाने जागेचे दर जाहीर केल्यानंतर शेतकºयांचा जागा देण्यास प्रतिसाद मिळू लागला आहे.

 Problems with appraisal of live purchases | थेट खरेदीला मूल्यांकनाची अडचण

थेट खरेदीला मूल्यांकनाची अडचण

Next

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी सिन्नर तालुक्यातील सव्वादोनशे शेतकºयांनी थेट खरेदीने जागा देण्याची तयारी दर्शविली असली तरी, महामार्गासाठी जागा जाणाºया शेतकºयांच्या गटातील अन्य मालमत्तेचे मूल्यांकन करण्यात शासकीय यंत्रणांनी वेळकाढूपणा अवलंबिल्याने खरेदीत अडचणी निर्माण झाल्या असून, त्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. समृद्धी महामार्गासाठी जिल्हा प्रशासनाने जागेचे दर जाहीर केल्यानंतर शेतकºयांचा जागा देण्यास प्रतिसाद मिळू लागला आहे. आजपावेतो पंधराहून अधिक शेतकºयांनी पुढे येत जागेची खरेदी दिली असून, शेतकºयांना बाजारभावाच्या पाच पटीने अधिक पैसे देण्यात आले, शिवाय त्यांच्या शेतातील पिके, झाडे, फळबाग, विहीर, घर, गोठे, पाइपलाइन या साºया मालमत्तेचीही भरपाई देण्यात येत आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील सव्वादोनशे शेतकºयांनी दोन आठवड्यांपूर्वी प्रशासनाला पत्र देऊन जागा देण्याची तयारी दर्शविली. मात्र या शेतकºयांच्या शेतातील मालमत्तेचे मूल्यांकन अद्याप पूर्ण झालेले नाही. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने तीन आठवड्यांपूर्वी कृषी, वन, सार्वजनिक बांधकाम, महाराष्टÑ जीवन प्राधिकरण या यंत्रणांची बैठक घेऊन लवकरात लवकर मूल्यांकन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु मूल्यांकनाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. सोमवारी या संदर्भात पुन्हा बैठक झाली असता, कृषी, वन व महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने बहुतांशी गावांतील मूल्यांकन पूर्ण केले, परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याने मूल्यांकनाकडे दुर्लक्ष केल्याची बाब निदर्शनास आली. इगतपुरी तालुक्यातील एकाही गावात मूल्यांकन न झाल्याने जिल्हाधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली व येत्या आठवड्यात सर्वच यंत्रणांनी मूल्यांकनाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मूल्यांकनाचे काम पूर्ण झाल्यावर थेट खरेदीला वेग येणार असून, शुक्रवारी सिन्नर तालुक्यातील दोन शेतकºयांची जागा खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे व उर्वरित खरेदी टप्पाटप्याने करण्यात येणार असल्याची माहिती
विरोध मावळला?
समृद्धी महामार्गासाठी जागा देण्यास विरोध दर्शविणाºया शेतकºयांचे मत परिवर्तन करण्यास प्रशासनाला यश मिळाले असून, त्यामुळे विरोधाची धार कमी झाली आहे. शेतकºयांनी स्वत:हून पुढे येत थेट खरेदीने जागा देण्याची तयारी दर्शविण्याची बाब त्याचाच एक भाग आहे. शेतकरी संघर्ष समितीने या संदर्भात न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यांकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.

Web Title:  Problems with appraisal of live purchases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.