धनादेश वटण्यास अडचणी

By admin | Published: December 31, 2016 12:19 AM2016-12-31T00:19:21+5:302016-12-31T00:19:37+5:30

आर्थिक पत धोक्यात : व्यावसायिकांना पैसे मिळेना

Problems with Check Cashing | धनादेश वटण्यास अडचणी

धनादेश वटण्यास अडचणी

Next

नाशिक : केंद्र सरकारच्या जुन्या एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयानंतर थंडावलेले बाजार हळूहळू पूर्व पदावर येत असले तरी बाजारातील कॅशलेस व्यवहाराचे प्रमाण वाढल्याने बँकांची रोकड विरहित साधनांच्या माध्यमातून व्यवहार पूर्ण करताना दमछाक होतआहे. बँकांमध्ये चेकचा भरणा केल्यानंतर खात्यावर पैसे जमा होण्यासाठी ८ ते १० दिवसांचा कालावधी लागत असताना याच कालावधीत व्यावसायिकांना देय असलेल्या धनादेशांचा अनादर होऊन आर्थिक कोंडी होत असल्याने व्यावसायिकांसह नागरिकही त्रस्त झाले आहे. बँकांमध्ये मोठ्या रकमेच्या चेकचा भरणा केल्यानंतर वटविण्याची प्रक्रिया जलदगतीने होत नसल्यामुळे खात्यावर पैसे जमा होत नसून विविध देयकांच्या धनादेशांचा अनादर होण्याची शक्यता निर्माण झाल्याने व्यावसायिकांची आर्थिक पत धोक्यात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक मोठे व्यवहार चेकच्या माध्यमातून होत असतात. परंतु एकदा चेक बाउन्स झाला की, पुढील व्यवहार करताना संबंधित व्यावसायिकांविषयी साशंकता व्यक्त केली जाते. त्यामुळे कोणत्याही व्यवसायात व्यावासायिक आपली पत सांभाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून आर्थिक व्यवहार करीत असतो. असे व्यवहार करताना अनेकदा बाजारातून, मित्र परिवार तथा नातेवाइकांकडून पैसे जमवून खात्यावर भरणा करीत आपल्या खात्यावर येणाऱ्या धनादेशाचा अनादर होऊ देत नाही.  परंतु, केंद्र सरकारने जुन्या हजार व पाचशेच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर बाजारात सर्वसामान्य व्यावसायिकांना अशी मोठी रक्कम जमविणे  अशक्य झाले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये खात्यांवर धनादेशांद्वारे मोठी रक्कम खात्यावर भरणा करूनही व्यावसायिकांना आर्थिक व्यवहार करण्यात मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Problems with Check Cashing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.