येवल्यात मुख्याधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:43 PM2018-08-03T12:43:24+5:302018-08-03T12:43:34+5:30
येवला : येथील कॉलनी भागात आता विकास कामांसह स्वच्छता होण्याचे संकेत पालिका प्रशासन, मुख्याधिकारी आणि नगरसेविका यांच्या संयुक्तपणे प्रभागातील फेरफटका दरम्यान मिळाले.
येवला : येथील कॉलनी भागात आता विकास कामांसह स्वच्छता होण्याचे संकेत पालिका प्रशासन, मुख्याधिकारी आणि नगरसेविका यांच्या संयुक्तपणे प्रभागातील फेरफटका दरम्यान मिळाले. येवला पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांचा प्रशासनाचा दणका,आणि नगरसेविका शीतल शिंदे, विविध खात्यांचे अधिकारी यांनी कॉलनी भागात नागरी समस्या सोडवण्यासाठी फेरफटका मारला.येवला पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिंदे यांनी कॉलनी भागातील समस्या व विकासकामासंदर्भात आवाज उठावला होता.याबाबत मुख्याधिकारी सौ.नांदुरकर यांनी थेट नगरसेविका शीतल शिंदेसोबत संदर्भात प्रभाग गाठला आणि नागरिकांच्या भेटी घेतल्या. पालिकेच्या सभेत बाजीराव नगर पाणी टाकी मागील मिटिंग पाण्याची टाकीला काम्पौंड,जॉगिंग ट्रॅक तयार करणे या कामा बाबत सौ.नांदुरकर, सौ शिंदे यांनी स्वत: पाहणी केली.काम लवकर करण्याबाबत बांधकाम अभियंता इनामदार यांना सुचना केल्या.आनंद नगर भागात फेरफटका मारत असताना पालिका सध्या नागरिकांना गढूळ पाणी देत आहे.आरोग्याच्या तक्र ारी वाढल्या आहेत. यासह या भागात गटारी बांधण्याची मागणी नागरिकांनी केली.सहा महिन्यात प्रश्न मार्गी लागतील असे अश्वासन मुख्याधिकाºयांनी दिले.गोविंदनगर,पटेल कॉलनी, या भागात असणाºया खुल्या जागेत वाढलेले गावात काढावे. स्वच्छता करावी असे आदेश स्वच्छता निरीक्षक सुनील संसारे यांना दिले.सुमारे तीन तास कॉलोनी भागासह वडार वस्तीत फेरफटका मारून तक्र ारी समजावून घेवून त्यातून मार्ग काढण्याबाबत आश्वासन दिले.यावेळी या भागातील महिला पाठक, पळे नागपुरे, मापारी, जोशी, डहाके, छाताणी, मुंदडा, खैरनार, साळुंके, देवरे, सोनवणे, बोडके, आव्हाड, यांचेसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.