कळवण रस्त्यालगतच्या कॉलनीत समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:43 PM2019-12-23T23:43:01+5:302019-12-23T23:44:19+5:30

देवळा नगरपंचायत हद्दीत देवळा-कळवण रस्त्यालगत असलेल्या रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

Problems with Colony Road Colony | कळवण रस्त्यालगतच्या कॉलनीत समस्या

देवळा नगरपंचायत हद्दीतील रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रोडने शेतमालाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर.

googlenewsNext
ठळक मुद्देदेवळा : रस्ता डांबरीकरणाची मागणी

देवळा : देवळा नगरपंचायत हद्दीत देवळा-कळवण रस्त्यालगत असलेल्या रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
देवळा नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र . १६ मध्ये रामराव हौसिंग सोसायटी ही वसाहत येते. वाजगाव व कळवण रस्त्याने जाणारी वाहने शॉर्टकट म्हणून या कॉलनी रस्त्याचा प्रामुख्याने वापर करतात. तालुक्याच्या पश्चिम भागातील वाजगाव, वडाळे, खर्डा, देवळा शहराचा पश्चिम भाग, रामेश्वर, कनकापूर, कांचणे, मुलूखवाडी, शेरी, वार्शी, हनुमंत पाडा, आदी गावांतील शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीत नेण्यासाठी या मार्गाचा अवलंब करतात. ट्रॅक्टर, बैलगाडी, पिकअप यामुळे कॉलनी भागातील रस्त्याची वाताहत झाली आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
कॉलनीपासून १०० मीटरवर देवळा शहर आहे. शेतकरी मुख्य रस्त्याने कांदा मार्केटकडे न जाता शॉर्टकट म्हणून कॉलनी रस्त्याने कांद्याने भरलेले ट्रॅक्टर व इतर वाहने घेऊन जातात. यामुळे दिवसभर रामराव हौसिंग वसाहतीत ट्रॅक्टर, पिकअप, बैलगाडी, रिक्षा आदी वाहनांची वर्दळ असते. पहाटे पाच वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत दडीशे ते दोनशे वाहने या रस्त्याने ये-जा करतात.
वाहनांच्या वर्दळीमुळे दिवसभर सर्वत्र धूळ उडत असते. या भागातील घरातील वस्तूंवर धुळीचा थर दिसून येत आहे. यामुळे महिला वर्ग त्रस्त झाला आहे. धुळीमुळे येथील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक नागरिकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. देवळा नगरपंचायतीने या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

Web Title: Problems with Colony Road Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.