इंदिरा गांधी वसाहतीतील समस्यांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:29 AM2019-06-24T00:29:01+5:302019-06-24T00:29:21+5:30

जुने सिडको येथील इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एकमधील बंद अवस्थेत असलेल्या शौचालयात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून, परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 Problems in Indira Gandhi colony increase | इंदिरा गांधी वसाहतीतील समस्यांत वाढ

इंदिरा गांधी वसाहतीतील समस्यांत वाढ

Next

सिडको : जुने सिडको येथील इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एकमधील बंद अवस्थेत असलेल्या शौचालयात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून, परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जुने सिडको येथील इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एकमध्ये तीन हजारांहून अधिक रहिवासी राहात असून, येथील रहिवासींना महापालिकेकडून मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी रहिवासींकडून करण्यात येत आहे. याठिकाणी रहिवासी राहात असलेल्या ठिकाणी जुने शौचालय गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असून, या शौचालयात मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला आहे. सदरचा कचरा मनपाकडून उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या घाण असलेल्या परिसराच्या बाजूला रहिवासी राहत असल्याने याचा त्यांना त्रास होत असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
घंटागाडी येथील नागरिकांचा दैनंदिन कचरा उचलत असले तरी बंद शौचालयातील कचरा उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच यामुळे डासांचे प्रमाणाही वाढले असून, महापालिकेच्या या निष्काळजीपणामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जुने शौचालय बंद करून मनपाने याठिकाणी दुसऱ्या जागेत नवीन शौचालय तयार केले असले तरी नवीन शौचालयाचीदेखील दुरवस्था झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. एकूणच महापालिकेने मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी अपेक्षा रहिवासींनी केली आहे.
जुने शौचालय असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कचरा उचलला गेला नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याच परिसरात लहान मुलंदेखील खेळत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, मनपाने याबाबत त्वरित दखल न घेतल्यास मनपाच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढणार.
- शरद जाधव, शहराध्यक्ष, अखिल महा. वडार समाज संघटना

Web Title:  Problems in Indira Gandhi colony increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.