वैतरणाची अतिरिक्त जमीन परत करण्याची कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:11 AM2021-06-04T04:11:47+5:302021-06-04T04:11:47+5:30

लोकमत न्युज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वैतरणा धरणाची अतिरिक्त ६२३ हेक्टर जमीन संबंधित शेतकऱ्यांना परत मिळावी यासाठी ...

Proceedings to return the excess land of Vaitarna | वैतरणाची अतिरिक्त जमीन परत करण्याची कार्यवाही

वैतरणाची अतिरिक्त जमीन परत करण्याची कार्यवाही

Next

लोकमत न्युज नेटवर्क

त्र्यंबकेश्वर : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वैतरणा धरणाची अतिरिक्त ६२३ हेक्टर जमीन संबंधित शेतकऱ्यांना परत मिळावी यासाठी बुधवारी (दि.२) मुंबईत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी पाटील यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित फाईल सादर करण्याचे आदेश देतानाच सदर जमिनीचे मूल्यांकन तत्काळ

करत प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीला आमदार हिरामण खोसकर उपस्थित होते. वैतरणा धरणाची अतिरिक्त ६२३ हेक्टर जमीन परत मिळण्याकरिता यापूर्वी बैठक झाली होती. अतिरिक्त शिल्लक राहिलेली जमीन संबंधित शेतकऱ्यांना परत करावी, यासाठी शासनदरबारी वारंवार पाठपुरावा सुरू होता. मागील वर्षीच नियामक मंडळाने त्यास मान्यता दिलेली आहे. मात्र कोविडमुळे त्यास विलंब झाला. त्यामुळे याबाबत त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी आमदार खोसकर यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली. जयंत पाटील यांनी त्याबाबत दखल घेत कार्यवाहीचे आदेश दिले.

इन्फो

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

चार-पाच दशकांपूर्वी झालेल्या वैतरणा धरणासाठी शासनाने स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. त्यापैकी ६२३ हेक्टर म्हणजे सुमारे १५५० एकर अतिरिक्त जमीन ही वापरात नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना त्या परत करून सातबारावर भोगवटदार शेतकऱ्यांचे नाव लावावे, अशी अनेक वर्षांपासूनच मागणी होती. आता जलसंपदा मंत्र्यांनी याबाबत दखल घेतल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

फोटो- ०३ वैतरणा मिटिंग

वैतरणा धरणाच्या अतिरिक्त जमिनीबाबत आयोजित बैठकीप्रसंगी जलसंपदा मंत्री जयंत पाटील. समवेत आमदार हिरामण खोसकर व अधिकारी.

===Photopath===

030621\03nsk_18_03062021_13.jpg

===Caption===

फोटो- ०३ वैतरणा मिटिंगवैतरणा धरणाच्या अतिरिक्त जमिनीबाबत आयोजित बैठकीप्रसंगी जलसंपदा मंत्री जयंत पाटील. समवेत आमदार हिरामण खोसकर व अधिकारी. 

Web Title: Proceedings to return the excess land of Vaitarna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.