नाट्य शिबिरातून सुसंवादाची प्रक्रि या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:36 AM2019-05-28T00:36:45+5:302019-05-28T00:36:59+5:30

आजच्या इंटरनेटच्या जगात मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिबिरे ही मोलाची भूमिका बजावत असतात. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करत असतात. संवाद हरवलेल्या या काळात नाट्य शिबिरातून सुसंवादाची स्वत:ला शोधण्याची प्रक्रि या नव्याने सुरू होते, असे प्रतिपादन विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी यांनी केले.

 The process of communication from the drama camp | नाट्य शिबिरातून सुसंवादाची प्रक्रि या

नाट्य शिबिरातून सुसंवादाची प्रक्रि या

Next

नाशिक : आजच्या इंटरनेटच्या जगात मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिबिरे ही मोलाची भूमिका बजावत असतात. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करत असतात. संवाद हरवलेल्या या काळात नाट्य शिबिरातून सुसंवादाची स्वत:ला शोधण्याची प्रक्रि या नव्याने सुरू होते, असे प्रतिपादन विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यकलावंत लक्ष्मी पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बालनाट्य शिबिराचे’ आयोजन क्लब हाउस, सावरकरनगर येथे करण्यात आले होते. शिबिराच्या समारोपप्रसंगी शिंपी बोलत होते.
डॉ. शिंपी पुढे म्हणाले की, मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका तितकीच महत्तवाची आहे. मुलांची मानसिकता निरोगी राहावी याकरिता त्यांना आवडत्या क्षेत्रात करियर करण्याची संधी द्यावी. त्यातून त्यांना जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद मिळेल. यावेळी शिबिरार्थींनी विविध नाटिका व कविता सादर केल्या. शिबिरार्थींना डॉ. मनोज शिंपी
यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
शिबिर मार्गदर्शक लक्ष्मी पिंपळे म्हणाल्या की, मुलांमधील उपजत गुणांना नाट्य शिबिराच्या माध्यमातून व्यासपीठ मिळत असते व सादरीकरण करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. शिबिराची संकल्पना विश्वास ठाकूर यांची होती.

Web Title:  The process of communication from the drama camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.