साहित्याला सतत चैतन्यमय ठेवण्याची प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 01:28 AM2019-06-04T01:28:56+5:302019-06-04T01:29:09+5:30
नाशिकमध्ये साहित्य संमेलन का व्हावे? शहराला मोठी वाङ््मयीन परंपरा लाभलेली आहे़ यापूर्वी स्वातंत्र्यपूर्ण काळात १९४२ मध्ये मराठी साहित्य संमेलन ...
नाशिकमध्येसाहित्य संमेलन का व्हावे?
शहराला मोठी वाङ््मयीन परंपरा लाभलेली आहे़ यापूर्वी स्वातंत्र्यपूर्ण काळात १९४२ मध्ये मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले़ त्यानंतर सुमारे ६३ वर्षांनंतर २००५ मध्ये जानेवारी महिन्यात शिक्षण कर्मयोगी स्व़ वसंतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ७८ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले़
अशा दोन मोठ्या साहित्य संमेलनाचा अनुभव नाशिककरांना आहे़ यावर्षी सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना) यांच्या पदाधिकाऱ्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले आहे़ त्यासाठी औरंगाबाद येथे जाऊन महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांना निवेदन दिले आहे़ संमेलनाच्या मूळ उद्दिष्टांपासून दूर जाणा-या संमेलनाला मुळ उद्दिष्टांकडे आणणे हा मुख्य हेतू असावा़ तसेच संमेलन केवळ खर्च, व्यवस्था, निमंत्रणे, अनुदान, राजकारण यासाठी न गाजता साहित्यिक योगदानांसाठी गाजवीत मराठी भाषेच्या सन्मानासाठी प्रचार आणि प्रसारासाठी गाजावे हा हेतू असावा. कारण साहित्य संमेलन ही रसिकांसाठी पर्वणी असते़
संमेलनातून सादर होणाºया निमंत्रितांच्या नवोदितांच्या कविता तसेच साहित्य, समाज, संस्कृती, राजकारण माध्यमे यांच्या स्थित्यंतरांबद्दल होणारे परिसंवाद, चर्चासत्रे साहित्यास सतत चैतन्यमय ठेवून विचार प्रवृत्त करतात़ त्याचप्रमाणे लेखकांच्या मुलाखती, अध्यक्षीय भाषणे, ग्रंथ प्रदर्शने यातून नवे लेखक-कवी घडावेत हा संमेलनाचा उद्देश असतो़ त्यामुळे या संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले आहे़
सावानातील माझ्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना आणि सभासदांना तसेच सावानाशी निगडीत अनेक शैक्षणिक साहित्य, वाद्य, सांस्कृतिक, सामाजिक संस्थांचा पूर्वीच्या साहित्य संमेलनात सक्रिय सहभाग होता़ आगामी काळात साहित्य संमेलन आल्यास तसाच सहभाग राहील़ नाशिक हे ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतिक शहर असून, येथे साहित्य, कला, शिक्षण आदी विधायक उपक्रम होतात़ तसेच विचारांचे आदान-प्रदान होते़ नाशिकमध्ये पुन्हा एकदा साहित्यिक वातावरण व्हावे, ग्रंथोत्सव, भाषा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी संमेलनाचे आयोजन करण्यात यावे, असे वाटते़
- वेदश्री थिगळे
समाज व राज्यश्रयाची साथ घेऊन साहित्य संमेलन यशस्वी होते़ त्यातून साहित्याचा विकास होतो़ ग्रंथाची आरास दिसते, वैचारिक चर्चा घडते़ लेखक, वाचक, प्रकाशक, समीक्षक, संशोधक आणि अध्यक्षीय मनोगत यांच्या सन्मानासाठी साहित्य संमेलनासाठी साहित्य संमेलन व्हावे मुख्य म्हणजे साहित्य संमेलनाची स्मरणिका ही स्थित्यंतराचा दस्तऐवज आणि पुरावा असतो़ त्यामुळे वाचक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशित होणारी स्मरणिका जपून ठेवतात़