अकरावी प्रवेशासाठी आॅक्टोबरपर्यंत चालणार प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 01:21 AM2019-09-24T01:21:32+5:302019-09-24T01:21:57+5:30

अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी आतापर्यंत सातफेऱ्या पार पडल्यानंतरही अनेक जागा रिक्त असून, काही विद्यार्थ्यांनाही अपेक्षित महाविद्यालय मिळू न शकल्याने शिक्षण विभागाने विविध महाविद्यालयांमध्ये उपलब्ध जागांचे पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

 The process will run until October for the 11th Admission | अकरावी प्रवेशासाठी आॅक्टोबरपर्यंत चालणार प्रक्रिया

अकरावी प्रवेशासाठी आॅक्टोबरपर्यंत चालणार प्रक्रिया

Next

नाशिक : अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी आतापर्यंत सातफेऱ्या पार पडल्यानंतरही अनेक जागा रिक्त असून, काही विद्यार्थ्यांनाही अपेक्षित महाविद्यालय मिळू न शकल्याने शिक्षण विभागाने विविध महाविद्यालयांमध्ये उपलब्ध जागांचे पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे आता अकरावीची प्रवेशप्रक्रिया १ आॅक्टोबरपर्यंच चालणार असून, त्यासाठी २६ सप्टेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करावे लागणार आहे.
अकरावी प्रवेशप्र्रक्रियेची एक बायफोकल फेरी, तीन नियमित फेºया, एक विशेष फेरी, तर दोन प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य अशा एकूण सात फेºया पार पडल्या आहेत. मात्र तहीही काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याने शिक्षण विभागाने पुन्हा एकदा प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य ही विशेष फेरी सुरू केली असून, प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी देण्यात आली आहे.
शिक्षण विभागाने प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य पद्धतीने तिसरी आणि एकूण फेºयामध्ये आठव्या फेरी सोमवारपासून (दि.२३) प्रवेशप्रक्रिया सुरू केली असून, ही फेरी १ आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे. या फेरीत प्रवेश मिळणाºया विद्यार्थ्यांना प्रथम सत्राच्या परीक्षेसाठी कमी दिवस मिळणार असल्याने अशा विद्यार्थ्यांसासाठी विशेष तासिका घ्याव्या, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. दहावीची नियमित परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर आता फेरपरीक्षेतील उत्तीर्ण आणि एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश देण्यात येत आहेत. कमी टक्केवारी आणि अभ्यासक्रम अर्धा पूर्ण झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास अनेक महाविद्यालयांकडून टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
दरम्यान, यापूर्वीच्या फेरीत प्रवेश मिळालेल्या परंतु महाविद्यालय बदलू इच्छिणाºया विद्यार्थ्यांनाही सोमवारी संकेतस्थळावरून प्रवेश रद्द करण्याची संधी देण्यात आली होती, तर प्रवेशासाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना २६ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करता येईल.

Web Title:  The process will run until October for the 11th Admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.