नागलीवरील प्रक्रिया उद्योगाला मिळणार चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:13 AM2021-05-16T04:13:45+5:302021-05-16T04:13:45+5:30
-आत्मनिर्भर भारत - एक गाव एक वाण अंतर्गत नागलीचा समावेश आत्मनिर्भर भारत : एक गाव एक वाण अंतर्गत नागलीचा ...
-आत्मनिर्भर भारत - एक गाव एक वाण अंतर्गत नागलीचा समावेश
आत्मनिर्भर भारत : एक गाव एक वाण अंतर्गत नागलीचा समावेश
पेठ : अन्नधान्याची राणी व आदिवासी बांधवांची कणसरी समजल्या जाणाऱ्या नागली पिकावर स्थानिक प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत योजनेत नागली व वरई या दोन पिकांचा समावेश करण्यात आला असून, आधुनिक शेती तंत्रज्ञानात दुर्मिळ झालेल्या नागलीला सुगीचे दिवस येणार आहेत. केंद्र शासनाने एक गाव एक वाण या अभियानांतर्गत शेतकरी व शेतकरी गटांना स्थानिक पिकांवर प्रक्रिया उद्योग करून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आदिवासी भागात पिकविल्या जाणाऱ्या नागली पिकाचा समावेश करण्यात आला आहे. पेठ तालुक्यात साधारण आठ हजार हेक्टर वर नागलीचे पीक घेतले जात असून, शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून लघू व मध्यम प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
--------------------
संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने उत्पादन
नागली या पिकाला आदिवासी भागात सर्वोत्तम स्थान असून, केवळ पावसाचे पाणी व शेणखत वापरून नागलीचे उत्पादन घेतले जाते. कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते न वापरता उत्पादित केलेल्या नागलीपासून पापड, शेवाया, कुरडया, बिस्कीट, लाडू, पेज असे विविध पदार्थ तयार करून त्याची विक्री केल्यास शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळू शकणार आहे.
----------------
केंद्र, राज्य शासनाचे संयुक्त अनुदान
नागली पिकावरील प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी एकूण प्रक्रिया मुलाच्या ३५ टक्के अनुदान देण्यात येणार असून यामध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के, तर राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग असणार आहे. वैयक्तिक शेतकरी, बचत गट किंवा शेतकरी गट या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
--------------पेठ तालुक्यात डोंगर उतारावर घेण्यात येणाऱ्या नागली या पिकाला आयुर्वेदातही महत्त्वाचे स्थान असून, सध्या नागलीवर प्रक्रिया उद्योग नसल्याने वर्षानुवर्ष उत्पादनात घट होऊ लागली आहे. आत्मनिर्भर भारत या योजनेतून शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक गट यांच्या माध्यमातून छोटे प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास नागली पिकाला स्वतंत्र वैभव प्राप्त होईल.
-अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी, पेठ
(१५ पेठ १)
===Photopath===
150521\images (10).jpeg~150521\images (8).jpeg~150521\images (11).jpeg
===Caption===
आदिवासी भागात उत्पादित होणारे नागलीचे पिक~फोटो 2~फोटो 3