महर्षी वाल्मीक यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:13 AM2018-10-25T01:13:37+5:302018-10-25T01:13:54+5:30
भगवान महर्षी वाल्मीक जयंतीनिमित्त परिसरात ठिकठिकाणी प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त सायंकाळी काढण्यात आलेली मिरवणूक उत्साहात पार पडली.
नाशिकरोड : भगवान महर्षी वाल्मीक जयंतीनिमित्त परिसरात ठिकठिकाणी प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त सायंकाळी काढण्यात आलेली मिरवणूक उत्साहात पार पडली. भगवान महर्षी वाल्मीक यांच्या जयंतीनिमित्त देवळालीगाव, सत्कार पॉइंट, अनुराधा, दुर्गा उद्यान, भाजीबाजार, बिटको, शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा, सुभाषरोड, जेलरोड, जयभवानीरोड, गोरेवाडी आदी ठिकाणी आकर्षक व्यासपीठ उभारण्यात आले होते. बुधवारी ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मीक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. जयभवानीरोड येथे भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदेच्या वतीने भगवान महर्षी वाल्मीक यांच्या प्रतिमेचे जिल्हा प्रभारी राजपाल चटोले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी सुनील राठोड, जिल्हाध्यक्ष अॅड. विशाल बागडी, सचिव नीलेश कसे, नाशिक शहर अध्यक्ष सतीश अलई, उपाध्यक्ष प्रकाश थामेत कार्याध्यक्ष सागर महेरोलिया, नाशिकरोड शहर अध्यक्ष गुड्डू मेहेरोलिया आदी उपस्थित होते. रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन व महापालिका सफाई कामगारांच्या वतीने मनपा विभागीय कार्यालयाजवळ प्रभाग सभापती पंडित आवारे, नगरसेविका ज्योती खोले, सरोज आहिरे, माजी नगरसेवक सुनील वाघ यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी रामबाबा पठारे, संतोष वाघ, बबलू ढकोलिया, संजय चिखले, नीलेश राठोड, जनार्दन घंटे, संजय चव्हाण, बंटी सोदे, राजा विव्हाल, प्रकाश वाघमारे, राजू निरभवणे, विजय मोरे आदी उपस्थित होते.
दोन चित्ररथ
भगवान महर्षी वाल्मीक यांच्या जयंतीनिमित्त देवळालीगावातून दोन चित्ररथ व गोरेवाडी येथून एका चित्ररथाद्वारे मिरवणूक काढण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात निघालेली मिरवणूक आंबेडकर पुतळा येथे विसर्जित करण्यात आली. मिरवणुकीमध्ये वाल्मीक समाज बांधव सहभागी झाले होते.