चांदवडला आदिवासीदिनानिमित्त मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 10:22 PM2018-08-10T22:22:36+5:302018-08-10T22:23:59+5:30
चांदवड येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त श्री रेणुकादेवी मंदिर व देवी हट्टी परिसरातून आदिवासी बांधवांकडून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत चांदवड तालुक्यातील गावोगावचे आदिवासी बांधव, महिला-पुरुष लाल बावटा विळा हातोड्याचे ध्वज घेऊन नृत्य करीत होते. या मिरवणुकीत विविध गावचे चित्ररथही सहभागी झाले होते. वन्य जमीन कसणाऱ्यांच्या नावे करावी यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. सोमवारपेठेत विविध वक्त्यांची भाषणे झाली. एकलव्यांच्या प्रतिमापूजनाने मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीच्या अग्रभागी एकलव्य महाराज यांचा चित्ररथ होता. यावेळी चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास चौधरी, रामचंद्र जगताप यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. याप्रसंगी आदिवासी बांधवांच्या वतीने तहसीलदार, प्रांताधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.