सप्तशृंगगडावर कोजागिरी पौणिर्मेला छबिन्याची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 02:02 PM2020-10-30T14:02:34+5:302020-10-30T14:03:05+5:30
वणी : सप्तशृंगगडावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच तृतीय पंथीयांनी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त छबिन्याची मिरवणुक काढली.
वणी : सप्तशृंगगडावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच तृतीय पंथीयांनी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त छबिन्याची मिरवणुक काढली. गडावर कोजागिरी पौणिर्मेचा उत्सवाला कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. पौणिर्मेला शिवालय तलावात तृतीयपंथीयांंनी स्नान केले .नविन वस्त्र परिधान करुन विविध प्रकारचे दागदागिने घालुन सुवणर्लंकारांचे सुशोभिकरण केले. कुलदेवता देवींच्या मुर्ती, गुरुंच्या फोटोचे पुजन पुजाविधी मंत्रोच्चाराच्या साथीने करण्यात आला. नवसपुर्तीसाठी कडुनिंबाच्या पानांचा प्रतिकात्मक वापर करुन पुजाविधी करण्यात आला व नवसाच्या स्वरुपाचा उल्लेख करुन कुलदेवीला व देवताना साकडे घालण्यात आले. नवसपुर्ती झाल्यानंतर पुढील वर्षी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द घेण्यात येतो मात्र कोरोनामुळे या वर्षी मर्यादा आल्या होत्या. दरम्यान दुपारच्या सुमारास कुलदेवीचा फोटो, चांदीची मूर्ती सुशोभित छबिन्यात ठेवण्यात आली. काही तृतीयपंथी सुशोभीत टोपलीत गुरुंचा फोटो देवीच्या मूर्ती ठेवल्या. गडावरील सर्व भागातून मिरवणुक पहिल्या पायरीपर्यंत नेण्यात आली. कुलदेवी व सप्तशृंगी देवीचे दर्शन करण्यात आले. प्रशासनाने भावना जाणुन घेत विनंतीला मान देत परंपरा खंडीत होऊ नये म्हणून गडावर धार्मिक कार्यक्रम व छबिना मिरवणुकीस परवानगी नियमांना बांधिल राहुन दिली आहे. त्या नियमांचा प्रशासनाच्या सुचनांचे पालन करत प्रातिनिधीक स्वरुपात परंपरेचे जतन करण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिल्याची माहिती पायल गुरु, भास्कर गुरू यांनी दिली.