सटाणा येथे एकलव्य जयंतीनिमित्त मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 05:38 PM2019-03-04T17:38:24+5:302019-03-04T17:38:31+5:30

सटाणा : शहर व तालुक्यात विविध कार्यक्र मांनी वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरामधून वीर एकलव्याच्या पुतळ्याची सोमवारी (दि. ४) ढोलताशाच्या गजरात गुलालाची उधळण करून मिरवणूक काढण्यात आली.

 Procession on Eklavya Jubilee celebration in Satana | सटाणा येथे एकलव्य जयंतीनिमित्त मिरवणूक

सटाणा येथे एकलव्य जयंतीनिमित्त मिरवणूक

googlenewsNext
ठळक मुद्देसटाणा शहरासह तालुक्यातील वाडीपिसोळ, जायखेडा, ताहाराबाद, वीरगाव, मुंजवाड, ब्राह्मणगाव, नामपूर, लखमापूर, वटार, मळगाव, अजमीर सौंदाणे, आराई आदी ठिकाणी जयंतीनिमित्त बागलाणचे माजी आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते एकलव्याची प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.


सटाणा : शहर व तालुक्यात विविध कार्यक्र मांनी वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरामधून वीर एकलव्याच्या पुतळ्याची सोमवारी (दि. ४) ढोलताशाच्या गजरात गुलालाची उधळण करून मिरवणूक काढण्यात आली.
भगवान एकलव्यचा आदर्श घेऊन प्रत्येक तरु णाने शिक्षित होऊन देशाच्या उन्नतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन बोरसे यांनी केले. यावेळी ठिकठिकाणी भगवान एकलव्यच्या प्रतिमाचे आनावरण करण्यात आले. जयंतीनिमित्त ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर शहरातील देवमामलेदार यशवंतराव महाराज यांना अभिवादन करून एकलव्यची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. कचेरी रोड, उपासनी रोड, सरकारी दवाखाना, मल्हार रोड, टिळक रोड अशी मिरवणूक काढण्यात आली. नामपूर येथेही प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत माजी आमदार दिलीप बोरसे, आदिवासी एकलव्य संघटनेचे डोंगर बागुल, आनंदा मोरे, बापू सोनवणे, ब्राह्मणगावचे ग्रामपंचायत सदस्य गोटू पगार, नगरसेवक बाळू बागुल, मोरेनगरचे सरपंच सुरेश मोरे आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
फोटो कॅप्शन : सटाणा शहरात भगवान एकलव्य जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी आदिवासी बांधव व महिला. (04सटाणा एकलव्य्0

Web Title:  Procession on Eklavya Jubilee celebration in Satana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.