नाशकात नवसाला पावणाऱ्या दाजिबा विरांची पारंपरिक मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 06:40 PM2018-03-02T18:40:47+5:302018-03-02T18:40:47+5:30
दीडशे वर्षांहून अधिक परंपरा असणाऱ्या आणि नवसाला पावणा:या दाजीबा (बांशिग) वीर मिरवणूक शुक्रवारी (दि.2) बुधवार पेठेतून धार्मिक वातावरणात मोठया उत्साहात काढण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी अलोट गर्दी केलेल्या भाविकांनी दाजीबा वीराचे भक्तीपूर्ण वातावरणात दर्शन घेतले.
नाशिक : दीडशे वर्षांहून अधिक परंपरा असणाऱ्या आणि नवसाला पावणा:या दाजीबा (बांशिग) वीर मिरवणूक शुक्रवारी (दि.2) बुधवार पेठेतून धार्मिक वातावरणात मोठया उत्साहात काढण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी अलोट गर्दी केलेल्या भाविकांनी दाजीबा वीराचे भक्तीपूर्ण वातावरणात दर्शन घेतले.
दाजीबा वीर मिरवणूक शुक्रवारी धुळवडच्या दिवशी बुधवार पेठेतून पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली. तत्पूर्वी, होळी पौर्णिमेच्या रात्री तळेगाव जानोरी (ता. दिंडोरी) येथे दाजीबा वीराची पारंपरिक पूजा क रून वीर नाशिकमध्ये आणण्यात आले.
दुपारी दोनच्या सुमारास जुने नाशिक येथील बुधवार पेठेतून दाजीबा वीराची मिरवणूक काढण्यात आली. दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरवणुकीची सुरवात यंदाही बुधवार पेठेतून झाली. मिरवणूक मार्गावर महिलांनी सडा-रांगोळी काढल्याने परिसरात प्रसन्न वातावरण होते.
ही मिरवणूक काजीपुरा, डिंगरअळी, टाकसाळ गल्ली, भद्रकाली, तेली गल्ली, रविवार कारंजा, रामकुंड येथे पूजा करून पुन्हा दाजीबा वीर मिरवणुकीचा बुधवार पेठेत समारोप झाला.
वीरांनी वेधले लक्ष
दाजीबा वीराची आस्था सर्व भाविकांत मोठया प्रमाणात असल्याने भाविक मिरवणूक मार्गात दाजीबा वीर बघण्यासाठी गर्दी करत असतात. रामकुंड परिसरात दाजीबा वीर मिरवणूक येत असल्याने शहरातील विविध भागांतील भाविक याठिकाणी येत वीरासह अन्य वीराचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करताना दिसून आले. दाजीबा वीर मिरवणुकीसाठी दर वर्षी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे पोलिसांतर्फे ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त चोख लावण्यात आला होता.
वीर नाचवण्याची अनोखी परंपरा
राज्यभरात धुळवडीचा उत्सवानिमित्त ठिकठिकाणी रंगांची उधळणही होते. पंरंतु, नाशिकमध्ये धुळवडीच्या दिवशी विरांना नाचवण्याची अनोखी परंपरा आहे. वेगवेगळ्या देव देवतांचे मुखवटे धारण करून हे विर नाशिकच्या गोदावरीत आपल्या घरातल्या देवांना स्नान घालतात आणि परततात. या विरांमध्ये महत्वाच्या असलेल्या दाजिबा विर मिरवणूक दुपारनंतर निघते. सुमारे दिडशे वर्षापासून गवळी घराण्याकडे या परंपरेचा मान आहे. शहरातून निघणारा हा दाजिबा वीर नवसाला पावणारा असल्याचे मानले जाते. त्यामुळेच या नवसाला पावणा:या दाजिबा विराच्या दर्शनासाठी नाशिककरांनी गर्दी केली होती.