दरेगावला वीरांची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 06:01 PM2020-03-11T18:01:49+5:302020-03-11T18:02:07+5:30
दरेगाव : येथे धूलिवंदनाला प्रथेनुसार वीरांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. विविध प्रकारची वेशभूषा करून वीर मिरवणुकीत सहभागी झाले होते.
आपल्या देवघरातील दिवंगत आजी-आजोबांचे टाक यांना खोबऱ्याच्या वाटीत ठेवून ती वेगवेगळ्या रंगाच्या कपड्यात बांधण्यात आली होती. घराघरातील लहान मुलांनी वेगवेगळी वेशभूषा करून ते टाक हाती घेऊन ढोलताशाच्या गजरात होळीभोवती प्रदक्षिणा घातल्या. बालवीरांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. डोक्यावर आकर्षक फेटे, कपाळी गंध, एका हातात काठी, तर दुस-या हातात वीर, कानात झुबे, तोळबंद या वेशभूषेतील वीर लक्ष वेधून घेत होते. डफ व ढोलताशाच्या गजरात वीरांची मिरवणूक काढण्यात आली. गावातील मुख्य चौकातील मारु ती मंदिरासमोरील होळीला प्रदक्षिणा पूर्ण करून मिरवणुकीची सांगता झाली. यानंतर वीरांना सन्मानाने घरी आणून वीरांची तळी भरण्यात आली. यावेळी गावातील सर्व समाजबांधव मिरवणुकीत उपस्थित होते.