लासलगावी वीरांची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:58 PM2018-03-03T23:58:42+5:302018-03-03T23:58:42+5:30
लासलगाव : येथून जवळच असलेल्या पिंपळगाव नजीक येथे धूलिवंदनाला वीरांची मिरवणूक काढण्यात आली.
लासलगाव : येथून जवळच असलेल्या पिंपळगाव नजीक येथे धूलिवंदनाला वीरांची मिरवणूक काढण्यात आली. होळीच्या दुसºया दिवशी धूलिवंदनला सायंकाळी मुलांच्या अंगाला कडुलिंबाचा पाला बांधून त्यांचा शृंगार करण्यात आला. त्यांना ‘नकटी’ म्हणतात. नकटींना वेगवेगळी नावे दिली जातात. ढोलताशाच्या गजरात ते होळीभोवती प्रदक्षिणा मारतात. त्यानंतरच गावातील प्रत्येक घरातून वीर निघतात. वीर वेगवेगळे पोशाख परिधान करतात. वीरांच्या एका हातात नवीन कपड्यात खोबºयाच्या वाटीत देवघरातील टाक (देवाची मूर्ती) असतो, तर दुसºया हातात काठी वा शस्त्र असते. ढोलताशाच्या गजरात वीर होळीभोवती प्रदक्षिणा मारतात. व डफ वाजवित मिरवत मिरवत होळीजवळ आणले जाते.