मिरवणुकीचा निधी शहीद जवानांच्या कुटूंबियांना सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 02:56 PM2019-02-20T14:56:40+5:302019-02-20T14:56:58+5:30

ओझर-दरवर्षी जल्लोषात साजरी होणारी ओझरची शिवजयंती यंदा रद्द करत जमा झालेला निधी शिवप्रेमींनी पुलवामा हल्यात शहीद झालेल्या जवानांच्या घरी जाऊन सुपूर्द करण्यात आला.

 Procession of the procession handed over to martyrs' families | मिरवणुकीचा निधी शहीद जवानांच्या कुटूंबियांना सुपूर्द

मिरवणुकीचा निधी शहीद जवानांच्या कुटूंबियांना सुपूर्द

googlenewsNext

ओझर-दरवर्षी जल्लोषात साजरी होणारी ओझरची शिवजयंती यंदा रद्द करत जमा झालेला निधी शिवप्रेमींनी पुलवामा हल्यात शहीद झालेल्या जवानांच्या घरी जाऊन सुपूर्द करण्यात आला. शिवजयंतीदिनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बुलढाणा जिल्ह्यातील गोवर्धन नगर (चोरपांगरा) येथे शहीद जवान नितीन राठोड यांच्या घरी त्यांचे वडील शिवाजी राठोड यांची भेट घेत सांत्वन करीत निधी दिला. त्यानंतर मलकापूर येथील संजय राजपूत यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी आणि मुलांकडे सदर निधी सुपूर्द केला.ओझरकर नागरिक,आमदार अनिल कदम, मराठा महासंघ व डॉ योगेश्वर चौधरी यांचा सहभाग होता. यावेळी दीपक जाधव, नितीन काळे , प्रशांत पगार, अमोल खाडे, डॉ.योगेश्वर चौधरी, दौलत देवकर, प्रकाश घुमरे, राजेंद्र मोरे, विशाल मालसाने, संतोष कदम, अमित कोळपकर, राजेंद्र रंजवे, बाळासाहेब पगार, बापू कर्पे उपस्थित होते. सगळा देश दु:खात असताना शिवजयंती साजरी करणे सयुक्तिक वाटले नाही.परिणामी तयारी जोमात असताना देशावर भ्याड हल्ला झाला.ओझर सोसायटी हॉल मध्ये तातडीची बैठक घेत जमा झालेला निधी जवानांच्या कुटुंबांना देण्याचा ठराव झाला.ओझरच्या नागरिकांनी देखील सदर निर्णयाचे स्वागत केले.दोन्ही जवानांच्या कुटुंबांना भेटुन गावकऱ्यांच्यावतीने आम्ही त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले असल्याची भावना ओझर मराठा महासंघाचे अध्यक्ष दीपक जाधव यांनी व्यक्त केली.

Web Title:  Procession of the procession handed over to martyrs' families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.