बलिप्रतिपदानिमित्त रेड्यांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:49 AM2019-10-31T00:49:34+5:302019-10-31T00:50:03+5:30

दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवारी (दि.२८) सायंकाळी विविध ठिकाणी रेड्यांची ढोल-ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात बलिप्रतिपदेला नाशिक शहरात विशेषत: पंचवटीत रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे.

 A procession of ray of sacrifice | बलिप्रतिपदानिमित्त रेड्यांची मिरवणूक

बलिप्रतिपदानिमित्त रेड्यांची मिरवणूक

Next

पंचवटी : दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवारी (दि.२८) सायंकाळी विविध ठिकाणी रेड्यांची ढोल-ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात बलिप्रतिपदेला नाशिक शहरात विशेषत: पंचवटीत रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे. सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करून काढलेल्या मिरवणुकीत भाविक आणि दुग्ध व्यावसायिक शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
सायंकाळी रेड्यांना आकर्षक सजावट करून त्यांच्या पाठीवर विविध संदेश लिखित करण्यात आले होते. रेड्यांच्या पाठीवर काढलेली विविध देवदेवतांची चित्रे, विविध संदेश रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. दुग्धव्यावसायिकांनी रेड्यांची सजावट केली. त्यानंतर पूजन व आरती केली. सायंकाळी ७ वाजता सवाद्य मिरवणूक सुरू झाली. नागेश्वर मंदिर येथून सवाद्य मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. पुढे रेड्यांना मिरवणूक मार्गावर असलेल्या गंगाघाट सांडव्यावरची देवी मंदिर, म्हसोबा महाराज, पंचवटी कारंजा, दिंडोरीरोड येथील म्हसोबा महाराज मंदिर आदी ठिकाणी दर्शनासाठी नेले होते.
मिरवणुकीत भास्कर शिंदे, अनिल कोठुळे, सुनील शिंदे, महेश कल्याणकर, भूषण शिंदे, महेश कोठुळे, सागर गरड, प्रकाश येवलेकर, वैभव येवलेकर आदींसह नागरिक उपस्थित होते.
मिरवणुकीच्या पुढे विद्युत रोषणाई केलेले वाहन व ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करण्यात आली. पंचवटीतील नागचौक, कृष्णनगर, आडगाव, सरदार चौक, नांदूर, मानूर, जुना आडगाव नाका, म्हसरूळ, पेठरोड, मखमलाबाद, दत्तनगर, नवनाथनगर, हिरावाडी येथील दुग्धव्यावसायिकांनी बलिप्रतिपदानिमित्ताने रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढली होती.

Web Title:  A procession of ray of sacrifice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.