सेवानिवृत्त जवानाची गावातून मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 11:29 PM2021-02-13T23:29:54+5:302021-02-14T00:32:04+5:30
पिंपळगांव लेप : येथील भुमिपुत्र गोरखनाथ नामदेव ढोकळे यांनी १७ वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याने त्यांची डिजेच्या स्वरात देशभक्तीपर गीतांच्या आवाजात पिंपळगाव लेप गावातून तरूणांच्या एकजुटीने गोरखनाथ यांची मिरवणूक काढली होती. तसेच प्राथमिक शाळेच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता
पिंपळगांव लेप : येथील भुमिपुत्र गोरखनाथ नामदेव ढोकळे यांनी १७ वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याने त्यांची डिजेच्या स्वरात देशभक्तीपर गीतांच्या आवाजात पिंपळगाव लेप गावातून तरूणांच्या एकजुटीने गोरखनाथ यांची मिरवणूक काढली होती. तसेच प्राथमिक शाळेच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता. भारतीय सैनिक ऐ. सी. पी हवालदार म्हणून बेळगावला भरती झाले होते. गोरखनाथ ढोकळे यांनी हालाकीच्या परिस्थितीतुन शिक्षण पूर्ण केले. २००४ मध्ये ते केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले.
तसेच १७ वर्षाच्या कालावधीत बेळगाव, कोलकत्ता, अरूणाचल प्रदेश, जामनगर, उत्तर प्रदेश अशी अहोरात्र देशसेवा करून ३१ जानेवारी २०२१ रोजी तेरपुर आसाम येथे सेवानिवृत्त झाल्याने पिंपळगाव लेप येथे त्यांच्या सत्कार प्रसंगी माजी. सरपंच मधुकर साळवे, मधुकर ढोकळे, बापु पोटे, अशोक दौंडे, किरण कापसे, दगुजी सोनवणे, संतोष गायकवाड, सचिन गायकवाड, सुभाष रसाळ, अनिल बिडवे, लहानु काळे, योगेश गागरे, रोहिदास गोधडे, विलास दुनबळे, नितीन रसाळ, सुनिल ढोकळे, किरण ढोकळे, संतोष ढोकळे, गणेश ढोकळे, अनिल ढोकळे, मच्छिंद्र ढोकळे, सचिन ढोकळे, सुकदेव ढोकळे, मल्हारी दौंडे, भावराव दौंडे, भगवान दौंडे, सागर काळे, शिवाजी पोटे, सयाजी ठुबे, गोकुळ ठुबे, कैलास लांडबिले, सचिन दौंडे, विजय साठे आदी उपस्थित होते.