सर्जा-राजाची वाजत गाजत मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:20 AM2019-08-31T01:20:33+5:302019-08-31T01:21:02+5:30
‘वाडा शिवार सारं वाड-वडिलांची पुण्याई, किती वर्णू तुझे गुण मन मोहरून जाई’ तझ्या अपार कष्टानं, बहरते सारी भुई, एका दिवसाच्या पूजेने, होऊ कसा उतराई’ या काव्यपंक्तींच्या भावार्थाला अनुसरून शहर व परिसरातील शेतकरी बांधवांनी बैल पोळा साजरा केला.
नाशिक : ‘वाडा शिवार सारं वाड-वडिलांची पुण्याई, किती वर्णू तुझे गुण मन मोहरून जाई’ तझ्या अपार कष्टानं, बहरते सारी भुई, एका दिवसाच्या पूजेने, होऊ कसा उतराई’ या काव्यपंक्तींच्या भावार्थाला अनुसरून शहर व परिसरातील शेतकरी बांधवांनी बैल पोळा साजरा केला. शहर परिसरातील पंचवटी परीसरासह बाजार समिती व दिंडोरी नाका भागातून बैलांची बैलांची मिरवणूक काढून म्हसोबाचे दर्शन घेऊन बाजार समिती आवारतून बैलांची मिरवणूक काढण्यात आली. त्याचप्रमाणे आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, दरी, मातोरी, आनंदवल्ली, पाथर्डी गाव, देवळालीागव, शिंदे पळसे येथे बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढून गावातील मारुती मंदिराजवळ सर्व शेतकऱ्यांनी बैलांना सजवून आणले होते.