देवळा येथे आदिवासी दिनानिमित्त मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 06:05 PM2018-08-10T18:05:11+5:302018-08-10T18:05:29+5:30
देवळा : देवळा तालुक्यात आदिवासी बांधवांच्या वतीने गुरु वारी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. प्रतिमापूजन, आदिवासी दिनाचे महत्त्व, पुरस्कार वितरण, मिरवणूक आदि कार्यक्र म यावेळी घेण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी एकलव्य संघटनेचे राज्यनेते दिलीप बर्डे हे होते.
देवळा : देवळा तालुक्यात आदिवासी बांधवांच्या वतीने गुरु वारी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. प्रतिमापूजन, आदिवासी दिनाचे महत्त्व, पुरस्कार वितरण, मिरवणूक आदि कार्यक्र म यावेळी घेण्यात आले.
कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी एकलव्य संघटनेचे राज्यनेते दिलीप बर्डे हे होते. देवळा ग्रामपालिकेचे माजी सरपंच रघु नवरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, नगरसेविका बेबी नवरे, कॉ.आशाबाई जाधव, शांताराम पवार, विकी सोनवणे, पपू सोनवणे, राजेंद्र वाघ, सागर गांगुर्डे, निवृत्ती वाघ, सुनिल गांगुर्डे, मंगेश शिंदे यांच्यासह तालुक्यातील गावांचे सरपंच उपस्थित होते. कार्यक्र माचा शुभारंभ वीर एकलव्य यांच्या प्रतीमापूजनाने झाली. कार्यक्र माचे प्रास्ताविक रघु नवरे यांनी केले. आदिवासी बांधवांनी यावेळी वेशभूषा करत कार्यक्र मात रंगत आणली. आदिवासी दिनाबाबत व आदिवासींबद्दल माहिती देण्यात येवून संघटीत राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्र मात आदिवासी समाजातील सायकलपटू भरत सोनवणे, शरीर सौष्ठवपटू भावेश शेवाळे, कराटेपटू जगदीश सोनवणे, पोलीससेवेत कार्यरत असलेली शीतल पवार, देविदास मोरे आदींचा यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पपू सोनवणे, रघु नवरे, दिलीप बर्डे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर वीर एकलव्य यांच्या प्रतिमेची सजवलेल्या ट्रॅक्टर वरून सवाद्य भव्य मिरवणूक देवळा शहरातून काढण्यात आली. कार्यक्र म यशस्वीतेसाठी गौतम गांगुर्डे, जिभाऊ पिंपळसे, भरत सोनवणे, विलास सोनवणे, बळीराम वाघ, मोहन जाधव, राकेश साळवे, मुन्ना सोनवणे, अनिल गांगुर्डे, देविदास वाघ, गंगाराम वाघ, गणेश वाघ आदींनी संयोजन केले. तालुक्यातील आदिवासी बांधव उपस्थित होते.
फोटो- देवळा येथे आदिवासी दिनानिमित्त येथील शहरातून निघालेली वीर एकलव्य यांची भव्य मिरवणूक