सातपूर येथे भगवानबाबा पुण्यतिथीनिमित्त मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:06 AM2019-01-22T01:06:51+5:302019-01-22T01:07:05+5:30

महाराष्ट्राचे दैवत संत श्री भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सातपूर अशोकनगर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तसेच परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली.

Proclamation on the occasion of Lord Buddha's death anniversary at Satpur | सातपूर येथे भगवानबाबा पुण्यतिथीनिमित्त मिरवणूक

सातपूर येथे भगवानबाबा पुण्यतिथीनिमित्त मिरवणूक

Next

सातपूर : महाराष्ट्राचे दैवत संत श्री भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सातपूर अशोकनगर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तसेच परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. अशोकनगर येथील नागरे चौकात आव्हान मंडळाच्या वतीने श्री भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. हभप नामदेव महाराज घुले यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान मंदिर सावरकरनगर येथून नागरे चौकापर्यंत पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी परिसरातील महिलांनी रस्त्यावर सडा-रांगोळी काढत पालखीचे स्वागत केले. नागरे चौकातील आयोजित कार्यक्र माचे अध्यक्षस्थानी माजी महापौर अशोक मुर्तडक होते.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुटे, महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार समिती सदस्य विक्र म नागरे, माजी नगरसेवक अ‍ॅड. तानाजी जायभावे, नगरसेवक सलीम शेख, सभापती योगेश शेवरे, कमलेश बोडके, विश्वास नागरे, गोकुळ नागरे, शांताराम कुटे, इंद्रभान सांगळे, माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, पुष्पाताई आव्हाड, किरण गामणे, नंदिनी बोडके, कावेरी घुगे आदी उपस्थित होते.
यावेळी दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या स्मरणप्रीत्यर्थ परिसरातील भजनी मंडळांना वाद्य भेट देण्यात आले. सकाळी हभप तुळशीराम महाराज गुट्टे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Proclamation on the occasion of Lord Buddha's death anniversary at Satpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक