मिरव‌णुकीला परवानगीसाठी शिवभक्तांची घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:14 AM2021-02-14T04:14:07+5:302021-02-14T04:14:07+5:30

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यात पारंपरिक मिरवणुकीला परवानगी मिळावी यासाठी शहरातील शिवभक्तांनी शुक्रवारी (दि.१२) छत्रपती शिवाजी महाराज ...

Proclamation of Shiva devotees for permission to march | मिरव‌णुकीला परवानगीसाठी शिवभक्तांची घोषणाबाजी

मिरव‌णुकीला परवानगीसाठी शिवभक्तांची घोषणाबाजी

Next

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यात पारंपरिक मिरवणुकीला परवानगी मिळावी यासाठी शहरातील शिवभक्तांनी शुक्रवारी (दि.१२) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून या विषयावर शनिवारी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवप्रेमींनीही चर्चेसाठी तयारी दर्शविल्याने अखेर परिस्थिती नियंत्रणात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवजयंती उत्सवात मिर‌वणूक काढण्यावर बंदी आणल्याने नाशिकमधील शिवभक्तांनी नाराजी व्यक्त करीत ‘जय भवानी, जय शिवाजी’ ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची कोटेकोर अंमलबजावणी करून मिरवणुकीला परवानगी देण्याची मागणी करीत काही काळा ठियाही दिला. तत्पूर्वी. शिवजन्मोत्वाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय व भद्रकाली पोलीस ठाण्यात शुक्रवारी शांतता समिती आणि शिवजयंती मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, मिरवणूक काढणारी सर्वमंडळे भद्रकालीत एकत्र आल्याने त्यांनी एकविचाराने सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्य पुतळ्याजवळ येऊन घोषणाबाजी केली. मात्र, पोलीस प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आली. यावेळी चेतन शेलार, सागर देशमुख, बाळासाहेब कोकणे, अंकुश पवार, नितीन रोठे, रोहित चौहान, हरी अंबेकर, अमोल पाटील यांच्यासह पारंपरिक मिरणुकीत सहभागी होणाऱ्या विविध मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Proclamation of Shiva devotees for permission to march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.