कॅप्सूल तंत्रज्ञानातून उत्पादनात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 11:58 PM2018-09-02T23:58:45+5:302018-09-03T00:01:59+5:30
पाथरे : कॅप्सूल तंत्रज्ञानातून पिकांना सेंद्रिय आणि जैविक खते देऊन शेती उत्पादनात वाढ करता येऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक आणि सेंद्रिय खतांचा नियोजनानुसार वापर करावा. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन होईल असे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांनी यावेळी सांगितले.
पाथरे : कॅप्सूल तंत्रज्ञानातून पिकांना सेंद्रिय आणि जैविक खते देऊन शेती उत्पादनात वाढ करता येऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक आणि सेंद्रिय खतांचा नियोजनानुसार वापर करावा. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन होईल असे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांनी यावेळी सांगितले.
पाथरे येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीमध्ये झालेल्या चर्चासत्रात शेतकºयांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, विभागीय कार्यालय नाशिक व एस.आर.टी. अॅग्रो सायन्स कंपनी छत्तीसगड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सेंद्रिय व जैविक शेती या विषयावर कार्यशाळा झाली. यावेळी व्यासपीठावर महामंडळाचे समन्वयक शशिकांत पठारे, उपव्यवस्थापक भरत जाधव, सहायक व्यवस्थापक सुनील शेलवले, उपव्यवथापक किशोर राठोड, विभागीय व्यवस्थापक रवींद्र पाटील, श्रीकांत बेहरे, कुणाल शित्रे, प्रमोद वझरे, पाथरे सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष गंगाधर सुडके, बाळासाहेब घुमरे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र घुमरे, नवनाथ नरोडे, चांगदेव गुंजाळ उपस्थित होते.
आंबा, शेवगा, सोयाबीन, वाटणे, भट, ऊस, कापूस, मूग, बाजरी, काकडी, भुईमूग, मका आणि भाजीपाला यासाठी उपयोग होतो. यावेळी शशिकांत पाटील, किशोर पठारे यांनीही शेतकºयांना कॅप्सूल तंत्रज्ञानाचा वापर करावा याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी सोसायटीचे संचालक मच्छिंद्र चिने, प्रवीण चिने, बाळासाहेब चिने, कारभारी सुडके, नारायण गुंजाळ, भाऊसाहेब नरोडे, रामनाथ चिने, भाऊसाहेब चिने, प्रमोद नरोडे, सूर्यभान गुंजाळ, अशोक गव्हाणे, मोहन दवंगे, संदीप ढवण, भीमा पवार, योगेश रहाणे आदींसह शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अण्णासाहेब चिने यांनी सूत्रसंचालन केले.कॅप्सूल हे तंत्रज्ञान भारताने विकसित केले असून, त्यातून औषधांची निर्मिती केली आहे. रासायनिक खतांपेक्षा स्वस्त आणि फायदेशीर ही खते आहेत. याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शासनामार्फत ही योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात पाथरे सोसायटीत प्रथमच शेतकºयांना याबद्दल माहिती देण्यात आली. याद्वारे शेती केली असता निश्चित फायदा होतो आणि पर्यावरण संरक्षण होते.