द्राक्षबागेतच आता बेदाणा निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 08:27 PM2020-04-16T20:27:27+5:302020-04-17T00:30:28+5:30
ओझर : सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे लॉकडाउनचा मोठा फटका द्राक्ष पंढरीत बसत असून, कवडीमोल दराने शेतकरी ऐन हंगामात काढणीला आलेली निर्यातक्षम द्राक्ष बेदाण्याला देत आहेत, परंतु दीक्षी (ता. निफाड) येथील सतीश चौधरी यांनी स्वत:च जोखीम घेऊन दोन एकर काढणीला तयार झालेल्या द्राक्षबागेवर डिपिंग आॅइल आणि पोटॅशियम बाय कार्बोनेट यांचे मिश्रण करून वेलीवर असणाऱ्या द्राक्ष घडांवर स्प्रे केला आहे. आणि छाटणी करत झाडावरची द्राक्षे झाडावरच ठेवली.

आधीच अतिवृष्टीने बेजार झालेल्या आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेऊन वाढविलेल्या ऐन हंगामात कोरोनाने बळीराजाचे तोंडचे पाणी पळाले असून, बॅँकेचे कर्ज आणि पेस्टिसाइडचे पैसे कसे द्यायचे असा प्रश्न हा शेतकऱ्यांना पडला आहे. या पडत्या काळात आलेल्या संकटावर मात करण्यासाठी जगाचा पोशिंदा अनेक उपाय शोधत आहेत. द्राक्ष हे नाशवंत पीक आहे. त्याच्यावर प्रक्रिया करूनच काही हाती लागेल हीच अपेक्षा सध्या बळीराजापुढे आहे.
आपल्या कृषिप्रधान देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. संपूर्ण अन्नधान्यापासून खाण्याच्या वस्तू या शेतीतूनच निर्माण केल्या नाही तर सीमेंटची जंगले पसरलेल्या मोठी लोकसंख्या भूकबळी ठरतील शासनाने शेतीत तयार झालेला मालासाठी उपाययोजना शोधली नाही तर ग्रामीण भागातील हा जगाचा पोशिंदा पेचात सापडल्याशिवाय राहणार नाही.
साधारणत: तीन किलो द्राक्षापासून एक किलो बेदाणा तयार होतो, त्यासाठी साधारणपणे सर्व खर्च धरून अडीचशे रु पये खर्च येतो आणि बाजारात एक किलो चांगल्या
प्रतीच्या नंबर एकच्या बेदाण्याला दीडशे ते जास्तीत जास्त दोनशे
रु पये दर मिळतो मग पन्नास रुपये जादा खर्चाची तोडमिळवणी कशी करायची? त्यातल्या त्यात या
द्राक्ष हंगामात बहुतांशी शेतकºयांनी बाजारपेठेत द्राक्ष जात नसल्याने
शंभर रुपयांत पाच किलो द्राक्ष देण्याचा उपाय शोधला तर काहींनी अल्प दरात म्हणजे आठ रुपये किलोप्रमाणे सर्रास बेदाण्यासाठी द्राक्ष दिल्याने यंदा बेदाणा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे बेदाण्यालाही भाव राहील असे वाटत नाही, परंतु शेतकरी सध्या हतबल झाला आहे.
---------
ऐन हंगामात लॉकडाउन झाल्याने द्राक्ष उत्पादकांची मोठी पंचाईत झाली. बेदाणे उत्पादक अडवणूक करून तयार माल कवडीमोल दराने घेत आहे. त्यामुळे तयार द्राक्षबागेवरच स्प्रे करून बेदाणा (मनुके) करण्याचा निर्णय घेतला. धोका स्वीकारून जवळपास दोन एकरमधून दोनशे क्विंटल मालावर प्रक्रि या करण्यात आली आहे.
- सतीश चौधरी, दीक्षी