मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 06:25 PM2019-07-16T18:25:06+5:302019-07-16T18:26:43+5:30
देशमाने गाव व परिसरात अल्प पावसावर खरीप हंगामातील पेरण्या झाल्या; पण पावसाने घेतलेली विश्रांती अन मका पिकावरील अळीने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे.
देशमाने : गाव व परिसरात अल्प पावसावर खरीप हंगामातील पेरण्या झाल्या; पण पावसाने घेतलेली विश्रांती अन मका पिकावरील अळीने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे.
खते, बियाणे उधार-उसनवारी करीत घेतले. अल्पपावसाच्या ओलीवर खरिपाची पिके उभी केली. मात्र गत ५ दिवसांपासून पावसाने पूर्णत: उघडीप दिल्याने सोयाबीन, मका, बाजरी, भुईमूग आदी पिके कोमजू लागली आहेत. चाऱ्याचा यक्ष प्रश्न उभा ठाकल्याने शेतकऱ्यांनी मका पिकाची अधिक लागवड केली. मात्र मका पिकावर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढल्याने शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. मका पिकावर अळीचा वाढलेल्या प्रादुर्भावामुळे महागड्या औषधांची फवारणी शेतकरी करत आहे. काही ठिकाणी तर औषधाच्या दोनदा फवारणी करूनही अळीचा प्रादुर्भाव कमी न होता वाढल्याने पिकावर नांगर फिरवायची वेळ आली आहे. पेरणी नंतरचा सर्व खर्च व वेळ वाया गेल्याने पुढे काय ? जनावरांचा चारा संपलेला आहे. चाºयासाठी मका पिक एकमेव पर्याय असून अळीमुळे पिकच नष्ट होत आहे. पाऊस उघडल्याने महागड्या औषधांच्या फवारणीमुळे पिके पिवळी पडून कोमेजू लागली आहे. या दुहेरी संकटामुळे शेतकरी अधिकच चिंताग्रस्त बनला आहे. देशमाने (खु) शिवारात मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव असून ताऊबा दुघड, संजय जाचक, सोन्याबापू दुघड, रामभाऊ दुघड, भाऊसाहेब दुघड आदींचे मका पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून सुचविण्यात आलेले उपाय व पर्याय जुजबी ठरत असल्याने अळीचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी होत आहे.