कांदा दरातील घसरणीमुळे उत्पादक चिंतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 06:38 PM2019-06-21T18:38:35+5:302019-06-21T18:39:51+5:30
कांद्याच्या वाढलेल्या दरात घसरणीचे वातावरण सुरु झाल्याने कांदा उत्पादकांमधे नैराश्याचे वातावरण आहे तर व्यापारी वर्गानेही कांदा खरेदीबाबत सावध पवित्रा घेतल्याने खरेदी विक्र ी च्या व्यवहार प्रणालीत अिस्थर व असमतोलाचे वातावरण आहे
वणी : कांद्याच्या वाढलेल्या दरात घसरणीचे वातावरण सुरु झाल्याने कांदा उत्पादकांमधे नैराश्याचे वातावरण आहे तर व्यापारी वर्गानेही कांदा खरेदीबाबत सावध पवित्रा घेतल्याने खरेदी विक्र ी च्या व्यवहार प्रणालीत अिस्थर व असमतोलाचे वातावरण आहे आठावडा भरात कांद्याची आवक व दर यात समान्वय राहीला नाही.सध्याचा कांदा साठवणुकीसाठी योग्य व भविष्यात दर वाढीचे संकेत देणारा असला तरी व्यापारीवर्गाला हा कांदा खरेदी करणे म्हणजे तारेवरची कसरत असल्याची माहीती कांदा निर्यातदार मनिष बोरा यांनी दिली. कारण सध्यिस्थतीत पाऊस लांबल्याने मध्यप्रदेश व राजस्थान या राज्यांमधील साठवणूक केलेला कांदा अतिउष्णतेमुळे खराब होऊ लागला आहे त्यामुळे तेथील व्यापार्यांनी सदरचा कांदा मोठ्या प्रमाणावर विक्र ीसाठी देशांतर्गत पाठविण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार खारेदी विक्र ीची प्रक्रि या त्या व्यापार्यांनु सुरु केल्याची माहीती बोरा यांनी दिली त्यामुळे परराज्यातील खरेदीदारांना तुलनात्मक रित्या कमी दरात कांदा उपलब्ध झाला आहे महाराष्ट्रातील त्यात नाशिक जिल्ह्यातील कांदा दर्जेदार टिकाऊ व चिवष्ट आहे मात्र तरीही मध्यप्रदेश व राजस्थान येथील कांद्याने पर्याय उभा केल्याने कांदा दरात घसरण सुरु झाली आहे. तसेच परदेशात कांदा निर्यातही मंदावली असुन सरकारने निर्यातदारांना निर्यातीच्या उलाढालीवर देण्यात येत असलेली दहा टक्के प्रोत्साहनपर रक्कम बंद केल्याने निर्यातदार व्यापार्याचा उत्साह मावळला आहे तसेच पाकीस्तान व चिनचा कांदा निर्यातीसाठी भारताच्या तुलनेत वीस ते तीस डा?लर कमी किमतीत परदेशी खरेदीदारांना उपलब्ध होत असल्याने या सर्वांचा एकत्रीत प्रतिकुल परीणाम व्यवहार प्रणालीवर झाल्याने दरात घसरण झाल्याची माहीती मनिष बोरा यांनी दिली.