व्यावसायिकांची होणार आठवड्यातून दोनदा तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 06:51 PM2020-07-01T18:51:29+5:302020-07-01T18:56:07+5:30
सिन्नर: तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या वावी गावात व्यवसाय करणाºया सर्वच व्यवसायिकांची आठवड्यातून दोन वेळा तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार आठवडे बाजारचे निमित्त साधून आरोग्य केंद्राच्या वतीने गावातील दुकानांमध्ये जाऊन व्यवसायिकांची इन्फ्रारेड थर्मामीटरद्वारे तपासणी करण्यात आली.
सिन्नर: तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या वावी गावात व्यवसाय करणाºया सर्वच व्यवसायिकांची आठवड्यातून दोन वेळा तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार आठवडे बाजारचे निमित्त साधून आरोग्य केंद्राच्या वतीने गावातील दुकानांमध्ये जाऊन व्यवसायिकांची इन्फ्रारेड थर्मामीटरद्वारे तपासणी करण्यात आली.
पेठेचे गाव असल्याने वावी गावात बाहेरून खरेदीसाठी येणाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते. याठिकाणी विविध सेवा पुरवणारे व्यावसायिक असून त्यांच्या संपर्कात अनेक व्यक्ती दररोज येत असतात. परिसरातील 15 ते 20 गावातील रहिवासी खरेदीच्या निमित्ताने वावीशी जोडले गेले आहेत. शेजारच्या कहांडळवाडी गावात एका 21 वर्षीय तरुणाला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यावर आरोग्य विभागाकडून वावी गावातील व्यावसायिकांची वेळोवेळी तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज आरोग्य सेवक प्रकाश तमनर यांनी आशा सेविकांना मदतीला घेत गावातील सर्व व्यवसायिकांची थर्मामीटर च्या सहाय्याने तपासणी केली. दुकानात ग्राहकांच्या संपर्कात असणाºया दुकानदार व त्यांच्या सहाय्यकांच्या शरीराचे तापमान यावेळी तपासण्यात आले. गावात यापुढे आठवड्यातून दोन वेळेस व्यवसायिकांची अशा पद्धतीने तपासणी करण्यात येणार असून यातून आपत्कालीन परिस्थितीत डेटाबेस तयार होणार असल्याचे आरोग्य सेवक तमनर यांनी सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, वैद्यकीय अधिकारी अजिंक्य वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गावात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. व्यवसायिकांनी दुकानात पूर्णवेळ मास्कचा वापर करावा. ग्राहकांशी सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करावेत. हँडसॅनिटायझरचा वारंवार वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
विना मास्क खरेदीसाठी येणाºया ग्राहकांना कोणतीही वस्तू विकत देऊ नये. त्यामुळे ग्राहकांमध्ये देखील जबाबदारीची जाणीव होईल व ते घराबाहेर पडताना मास्कचा वापर करतील असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने व्यवसायिकांना करण्यात आले आहे.