‘चालिहा व्रता’निमित्त भक्तिगीतांचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:39 AM2018-09-04T00:39:42+5:302018-09-04T00:40:23+5:30
येथील भगवान झुलेलाल मंदिरात चाळीस दिवस सुरू असलेल्या चालिहा व्रतादरम्यान मुंबई येथील सिंधी गायिका शोभा लालचंदानी व सहकारी यांचा सिंधी भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला.
देवळाली कॅम्प : येथील भगवान झुलेलाल मंदिरात चाळीस दिवस सुरू असलेल्या चालिहा व्रतादरम्यान मुंबई येथील सिंधी गायिका शोभा लालचंदानी व सहकारी यांचा सिंधी भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात सिंधी गायक करण खेमानी, नेहा उदासी, अर्चिता खेमानी, प्रतीक्षा भाटिया यांनी भक्तिगीतांचे गायन केले. सिंधी गीतांसह साईबाबांच्या शिर्डीवाले साईबाबा आया है तेरे दरपे सवाली आदी गाणी गायली. लाल झुलेलाल, झुलेलाल झुलेलाल यांसह जेको चवंदो झुलेलाल, तेंहिंजा थिंदा बेडा पारचा जयघोष करत सामूहिक पल्लव पठणाने कार्यक्र माचा समारोप करण्यात आला. यावेळी कॅसिओ-अशोक जैन, ढोलकी-हरीश दीक्षित, सिंधी ढोल-गजानन गवई तर सूत्रसंचालन शोभा लालचंदानी यांनी केले. कार्यक्रमास सिंधी पंचायतीचे अध्यक्ष रतन चावला, नगरसेवक भगवान कटारिया, अमित रोहेरा, आनंद कुकरेजा, मोहन सचदेव, जयप्रकाश चावला, रतन कुकरेजा, सुनील माखिजा, झामनदास अहुजा आदीसह उपस्थित होते.