निफाडला खंडेराव महाराज यात्रेनिमित्त १२ गाड्या ओढण्याचा कार्यक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 09:05 PM2019-02-19T21:05:00+5:302019-02-19T21:05:36+5:30
निफाड : येथील ग्राम दैवत श्री खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्र म मंगळवारी उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाविकांनी गर्दी केली होती.
निफाड : येथील ग्राम दैवत श्री खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्र म मंगळवारी उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाविकांनी गर्दी केली होती.
निफाड नगरपंचायत आणि श्री खंडेराव महाराज यात्रा कमिटी यांच्यावतीने श्री खंडोबा महाराज यात्रा माघपौर्णिमेला उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी श्री ची महापुजा करण्यात आली. त्यानंतर कादवाकाठी खंडोबा महाराज पादुकांची पुजा करण्यात आली. गंगेतुन आणलेल्या कावडीची शहरातुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत जि. प. प्राथमिक शाळा नं २ च्या विद्यार्थ्यांचे झांज पथक लक्ष वेधून घेत होते. तर जि. प शाळा न १ च्या विद्यार्थ्यांचे आदिवासी नृत्य होते. खंडेराव मंदिरात श्रींचा कावडीच्या पाण्याने अभिषेक करण्यात आला. दुपारी देवाचे मानकरी कचेश्वर दुसाने यांच्या निवासस्थानापासून देव मंदिरात आणण्यात आले त्यानंतर शहरातुन देवाच्या रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
या वर्षीचे रथाचे मानकरी महेश जंगम हे होते त्यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले महेश जंगम यांनी सजवलेल्या रथाचे सारथ्य केले या मिरवणुकीच्या अग्रभागी वाद्यवृंद होता हा रथ शिवाजी चौकात आणल्यानंतर हा रथ बारा गाड्यांना जोडण्यात आला. बारा गाड्या पिवळ्या रंगाने रंगविण्यात आल्या होत्या. बारा गाड्याच्या अग्रभागी मानाचा रथ जोडण्यात आलेला होता. ट्रॅक्टरच्या मशीनच्यासहयाने भंडारा उधळण्यात आला. प्रारंभी रथापुढे आरती म्हणण्यात आली फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. श्री खंडेराव मंदिराचे भगत रमेश शेलार यांनी सायंकाळी शिवाजी चौकातुन बारा गाड्या ओढल्या. यावेळी हजारो भाविकांनी खंडेराव महाराजकी जय असा जयजयकार करीत परिसर दणाणून सोडला होता.
याप्रसंगी श्री खंडेराव महाराज यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी, निफाड नगरपंचायतीचे नगरसेवक आदी उपस्थित होते. यावेळी भाविकानी गर्दी केली होती. मंगळवारी रात्रभर श्री खंडेराव महाराज मंदिर येथे जागरण गोंधळाचा कार्यक्र म संपन्न झाला.