नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:57 AM2019-03-11T00:57:35+5:302019-03-11T00:57:52+5:30

पंचवटी अहिर सुवर्णकार समाज संस्था व पंचवटी सराफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

Program on Naray Maharaj's death anniversary | नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

Next
ठळक मुद्देशहरातून मिरवणूक : समाजातील मान्यवरांचा सत्कार

नाशिक : पंचवटी अहिर सुवर्णकार समाज संस्था व पंचवटी सराफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
पंचवटी येथील वालझाडे मंगल कार्यालयात यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी पंचवटीतील हिरावाडीरोड, ओमनगर, कृष्णनगर भागातून भव्य बग्गी रथातून संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. समवेत घोडे, बॅण्डसह लाईटिंगच्या आकर्षक सजावटीसह सुवर्णकार समाज बंधू-भगिनी व सुवर्णकार, सराफ व्यावसायिक बहुसंख्येने उपस्थित होते.
मिरवणुकीनंतर कार्यालयात प्रारंभी संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी समाजाचे अध्यक्ष विजय बिरारी व सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्यामराव बिरारी व नाशिक अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दिंडोरीकर व नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर, सिडको समाजाचे माजी अध्यक्ष रमेश वडनेरे, पंचवटी समाजाचे माजी अध्यक्ष सुरेश बागुल, पंचवटीतील आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजलीसाहेब, माजी अध्यक्ष राकेश दुसाने, रविनाना बागुल, सुनील दुसाने, सचिन विरगावकर, रुपेश दाभाडे, राहुल विसपुते, राजेंद्र घोडके, जयवंत ओझरकर, शीतल बेदमुथा, श्रीकृष्णा दुसाने, रवींद्र मैंद, यशवंत मोरस्कर, विक्रम खरोटे आदी मान्यवरांच्या
हस्ते उत्साहात दीपप्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे राजेंद्र दिंडोरकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील दुसाने व सूत्रसंचालन किरण विसपुते, आभार प्रदर्शन सुरेश बागुल यांनी केले.
याप्रसंगी समाजभूषण पुरस्काराने सुनील दुसाने, समाजरत्न पुरस्काराने राकेश दुसाने व सराफ असोसिएशन भूषण पुरस्काराने शामराव बिरारी, तसेच सराफ असोसिएशन रत्न पुरस्काराने शीतल बेदमुथा तसेच समाजभूषण पुरस्काराने विजय बिरारी यांना नाशिक जिल्हा सोनार सुवर्णकार सराफ संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले.

Web Title: Program on Naray Maharaj's death anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.