राष्टÑीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 02:05 AM2019-03-02T02:05:01+5:302019-03-02T02:07:09+5:30
सामाजिक जीवनामध्ये प्रगती साधायची असेल तर वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगायलाच हवा. विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करूनच आपण यशाची शिखरे सर करू शकतो. आपल्या जीवनातील अज्ञान आणि अंधश्रद्धारुपी अंधकार कायमस्वरूपी दूर करायचा असेल तर विज्ञानाशिवाय तरणोपाय नाही. विज्ञान आणि विवेकवादी विचार हाच जीवनाचा पाया आहे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या आणि ग्राम पालिकेच्या सदस्या सौ. वेदिका होळकर यांनी केले.
नाशिक : सामाजिक जीवनामध्ये प्रगती साधायची असेल तर वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगायलाच हवा. विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करूनच आपण यशाची शिखरे सर करू शकतो. आपल्या जीवनातील अज्ञान आणि अंधश्रद्धारुपी अंधकार कायमस्वरूपी दूर करायचा असेल तर विज्ञानाशिवाय तरणोपाय नाही. विज्ञान आणि विवेकवादी विचार हाच जीवनाचा पाया आहे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या आणि ग्राम पालिकेच्या सदस्या सौ. वेदिका होळकर यांनी केले.
नुतन विद्या प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्र मात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
याप्रसंगी मंचावर शिक्षक पालक संघाच्या श्वेता मालपाणी, अश्विनी पवार, मनीषा पाटील, सीमा ठोके, यांच्या समवेत व्यवस्थापन समितीचे चेअरमन संदीप होळकर, सदस्य हसमुखभाई पटेल, योगेश पाटील, चंद्रशेखर होळकर, सचिन मालपाणी, मुख्याध्यापक सत्तार शेख आदी उपस्थित होते. कार्यक्र माची सुरु वात प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यालयात विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. या दिनाचे औचित्य साधून विज्ञान विषयक संदेश देणा-या रांगोळया रेखाटण्यात आल्या. प्रदर्शनाचे उद्घाटन सौ. वेदिका होळकर व मान्यवरांच्या हस्ते फित कापून झाले. शाळेतील बाल वैज्ञानिकांनी ध्वनि प्रदूषण, जलिनयोजन, सौरऊर्जा, गृहप्रकल्प व व्यवस्थापन, नैसिर्गक साधन संपत्तीचे व्यवस्थापन, पुनर्भरण, अवकाश संशोधन, स्मार्ट व्हीलेज, कृषी तंत्रज्ञान इत्यादी संकल्पनेवरील प्रकल्प सादर केले होते.