महापालिकेत सुशासन दिनानिमित्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:12 AM2020-12-26T04:12:44+5:302020-12-26T04:12:44+5:30
नाशिक : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेत सुशासन दिन शुक्रवारी (दि.२५) साजरा करण्यात आला. यानिमित्त शासकीय याेजनांचे ...
नाशिक : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेत सुशासन दिन शुक्रवारी (दि.२५) साजरा करण्यात आला. यानिमित्त शासकीय याेजनांचे लाभार्थी तसेच योजना तळागाळात पोहोचवणाऱ्यांचे सत्कार, तणाव व्यवस्थापन यासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने सभापती स्वाती भामरे यांनी उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिष्यवृत्ती येाजनेचे लाभार्थी देवयानी पवार, दिव्यांग महिला, विधवा महिलांच्या मुलींच्या विवाह योजनेत कार्यरत जया पिंगळे, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेचे अनिल पाटील, रोहिणी घोगरे, किरण सातपुते, मुक्ता सदगले, सागर हाके, रोहिणी नड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती भामरे यांनी यंदा या समितीच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ वंचितांपर्यंत देऊन खऱ्या अर्थाने सुशासनाचा अनुभव देण्यात येईल, असे सांगितले. कार्यक्रमास भाजप महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा रोहिणी नायडू, नगरसेविका प्रतिभा पवार, माधुरी बोलकर, बाळासाहेब सोनवणे, सुभाष जगताप आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या वतीने माहितीचा अधिकार, तणावमुक्ती व्यवस्थापन, सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यालयात तणावमुक्त व्यवस्थापन या विषयावर उदय धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले. पूर्व विभागीय कार्यालयात राजाराम जाधव, पश्चिम विभागीय कार्यालयात विवेक धांडे, नाशिकरोड येथे डॉ. दिलीप मेनकर , सिडकोत दशरथ भवर तर सातपूर येथे नितीन नेर यांनी मार्गदर्शन केले.
छायाचित्र आर फोटोवर २५ वाजपेयी- महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने आयोजित सुशासन दिनानिमित्त शासकीय येाजना आखणाऱ्यांच्या सत्काराप्रसंगी सभापती स्वाती भामरे, रोहिणी नायडू, प्रतिभा पवार, माधुरी बोलकर, बाळासाहेब साेनवणे, सुभाष जगताप आदी.