संघाचे काम करणाºया प्रत्येकास समर्पण तसेच त्यागमय भावनेचा संदेश संघ गीतांचा कार्यक्रम; नवीन चालीत सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:53 AM2018-02-05T00:53:45+5:302018-02-05T00:54:24+5:30
नाशिक : संघाचे काम करणाºया प्रत्येकास समर्पण तसेच त्यागमय भावनेचा संदेश देणाºया संघाच्या सुमारे दहा हजार प्रेरणा गीतांमधून नाशिककर तल्लीन झाले होते़
नाशिक : संघाचे काम करणाºया प्रत्येकास समर्पण तसेच त्यागमय भावनेचा संदेश देणाºया संघाच्या सुमारे दहा हजार प्रेरणा गीतांमधून काही निवडक गीतांना नाशिकमधील नावाजलेल्या संगीतकारांनी दिलेली नवीन चाल प्रख्यात गायकांनी आपल्या सुश्राव्य आवाजात केलेले सादरीकरण समवेत या गीतांचे शब्दरुपी निरूपण यामध्ये नाशिककर तल्लीन झाले होते़ निमित्त होते गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात संस्कार भारती नाशिक महानगरतर्फे रविवारी (दि़४) आयोजित स्वरांजली या संघ गीतांच्या कार्यक्रमाचे़ गायिका मीना परूळकर-निकम यांच्या ‘व्हावे जीवन यज्ञसमर्पण’ या गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली़ यानंतर मधुरा बेळे, रसिका जानोरकर, संजय गिते, आशिष रानडे, रसिका नातू, श्रृतकिर्ती बेडेकर यांनी संघांची विविध गीते सादर केली़ या गीतांना मकरंद हिंगणे, प्रशांत महाबळ, ज्ञानेश्वर कासार, प्रशांत महाबळ यांनी संगीत दिले़ प्रमुख पाहुणे सिनेदिग्दर्शक राजदत्त यांनी सांगितले की, काहीही समजत नसल्यापासून संघात जात असल्याने या विचारांचा पगडा आहे़ संघामध्ये बौद्धिक वर्ग तसेच गीते म्हणावी लागत असत़ त्यातील शब्द व सूर अनेक काळ मनात खदखदत असत़ सूर आणि संगीत हे माणसाला खूप चांगल्या पद्धतीने ज्ञान देते़ संगीताचे ज्ञान नसताना त्याचे सूरच त्याचा अर्थ हृदयापर्यंत पोहोचवितात़ त्यामुळे स्वरांजली कार्यक्रमाच्या माध्यमातून ही गीते समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे राजदत्त यांनी सांगितले़ तर माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी कार्यक्रमासाठी निवडण्यात आलेली गीते, त्यांचे संगीत व सादरीकरण व निरूपण करणारे प्रकाश पाठक यांचे कौतुक केले़ रवींद्र बेडेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, देश सर्वार्थाने संपन्न, चारित्र्यवान व सामर्थ्यवान बनावा यासाठी गत ९२ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यरत आहे़ संघाचे हजारो कार्यकर्ते घडविण्यामागे संघ गीतांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे़ या गीतांमधील काही निवडक गिते निवडून स्वरांजली हा कार्यक्रम संस्कार भारती नाशिकने तयार केला असून, त्याचा हा पहिलाच प्रयोग आहे़ कार्यक्रमाची सुरुवात संघाचे ध्येयगीत व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नटराज पूजनाने झाली़ यावेळी प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, चंद्रकांत घरोटे, सतीश कुलकर्णी, प्रदीप केतकर आदींसह मान्यवर उपस्थित होते़ या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक महानगर अध्यक्षा स्वाती राजवाडे, सचिव मेघना बेडेकर यांचे तर संगीत संयोजन हे डॉ़ पं़ अविराज तायडे यांचे होते़ सूत्रसंचालन किशोरी किणीकर कुलकर्णी यांनी तर आभार दिलीप कुलकर्णी यांनी मानले़