‘मराठी पाऊल पडते पुढे’ कार्यक्रम रंगला

By admin | Published: November 17, 2016 10:34 PM2016-11-17T22:34:51+5:302016-11-17T22:34:26+5:30

कलाविष्कार : शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन

The program started with 'Marathi Stepping Forward' program | ‘मराठी पाऊल पडते पुढे’ कार्यक्रम रंगला

‘मराठी पाऊल पडते पुढे’ कार्यक्रम रंगला

Next

नाशिकरोड : मोरया मोरया, देवा तुझ्या दारी आलो, काळ्या मातीत मातीत, खंडेरावाच्या लग्नाला, गोंधळ मांडिला, बाई मी लाडाची गं, आंबे आई जोगवा, जयोस्तुते अशा एकापेक्षा एक सरस गाण्यांचा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते जगदीश गोडसे, शिवसेना उपमहानगर प्रमुख नितीन चिडे, विभाग प्रमुख योगेश भोर, नगरसेवक अशोक सातभाई, हरिष भडांगे, साहेबराव खर्जुल, पंडित आवारे, मंदा गवळी, रमेश गायकर, बाबा बच्छाव, चंदू गोडसे, देवीदास काळे, विजय ताजनपुरे आदि मान्यवर उपस्थित होते.
मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाचे निर्माते उदय साटम, कलाकार विश्वास चव्हाण, दर्शन साटम, सचिन आगवणे, अमोल चव्हाण, श्रद्धा साळवी, उमा गावड आदिंनी विविध सदाबहार मराठी गीते लावण्या सादर करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले होते. कार्यक्रमाचे निवेदन दत्ता चाळके यांनी केले. प्रास्ताविक शिवशाही प्रतिष्ठानचे नितीन खर्जुल यांनी केले. यावेळी निखिल सातपुते, चंदू पाळदे, राजेश ताजनपुरे, किरण खर्जुल, बंटी खर्जुल, सागर खर्जुल, मनोज हांडोरे, संतोष खर्जुल, राजू राजगुरू, राजू खर्जुल आदिंसह परिसरातील रहिवासी, महिला उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The program started with 'Marathi Stepping Forward' program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.