रासबिहारी स्कूलमध्ये कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:15 AM2021-03-10T04:15:58+5:302021-03-10T04:15:58+5:30
परस्पर संवादात्मक ऑनलाइन सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात शाळेतील महिला पालक आणि शिक्षक उपस्थित होते. स्वत:च्या मानसिक ...
परस्पर संवादात्मक ऑनलाइन सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात शाळेतील महिला पालक आणि शिक्षक उपस्थित होते.
स्वत:च्या मानसिक आरोग्याविषयी कुटुंबासमवेत उघडपणे कसे बोलावे, हा सत्राचा विषय होता. या सत्राची सुरुवात ही ‘जोहरी विंडो’या संकल्पनेच्या स्पष्टीकरणाने झाली, जो सर्वांसाठीच नवीन विषय होता.
सत्रामुळे सहभागींना त्यांच्यातील कौशल्या व क्षमतांचा शोध कसा घेता येईल, हे सांगण्यात आले, तसेच त्यांच्या सुप्त गुणाचा शोध करून त्यांचा विकास कसा करता येईल, या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
महिलांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित प्रश्नांवरील चर्चेनंतर पीयुषी यांनी कोविड-१९ च्या या अनिश्चित काळात मानसिक आरोग्य हे कायम राखण्यासाठी विविध टिप्स आणि व्यायाम सांगितले आणि तणाव हाताळण्याविषयीच्या विविध टिप्सही दिल्या.
संपूर्ण सत्रादरम्यान, पीयुषी यांनी सर्व मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा त्यांच्या समाजातील सदस्यांशी आवश्यक
असलेल्या कोणत्याही समस्येबद्दल / मदतीसाठी मोकळेपणाने बोलण्यास प्रोत्साहित केले, तसेच आपल्या विचारांबद्दल
आणि भावनांबद्दल एक दैनंदिनी लिहावे, असे सुचविले. महिला पालक, शिक्षक आणि सदस्यांनी
या सत्रात सक्रिय भाग घेतला.