आॅनलाइन शॉपिंगच्या निषेधार्थ घोटीत व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:44 PM2018-09-28T12:44:40+5:302018-09-28T12:45:22+5:30
घोटी : आॅनलाइन शॉपिंग मुळे स्थानिक व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असून आॅनलाइन व्यवसाय करणा-या कंपन्या आणि मॉल मधील विदेशी गुंतवणूकी मुळे व्यापा-यांना आर्थिक नुकसान होत असल्याने शासनाच्या व्यापारीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ घोटी व्यापारी संघटनेच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.
घोटी : आॅनलाइन शॉपिंग मुळे स्थानिक व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असून आॅनलाइन व्यवसाय करणा-या कंपन्या आणि मॉल मधील विदेशी गुंतवणूकी मुळे व्यापा-यांना आर्थिक नुकसान होत असल्याने शासनाच्या व्यापारीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ घोटी व्यापारी संघटनेच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. देशात आॅनलाइन शॉपिंग समजल्या जाणा-या आॅलमार्ट, अमेझॉन, फ्लिपकार्ट तसेच आॅनलाइन व्यवसाय करणा-या मॉलमुळे स्थानिक व्यवसाय आर्थिक संकटात सापडले असल्याने या व्यवसायावर अंकुश आणावा या मागणीसाठी आज घोटी शहरातील व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय कडकडीत बंद ठेवले.दरम्यान आपल्या मागण्याचे निवेदन व्यापारी बांधवानी तहसीलदार आणि घोटी पोलिसांना दिले.दरम्यान या बंदमध्ये धान्य व्यापारी,इलेक्ट्रॉनिक असोसिएशन आदी सहभागी झाले होते. दरम्यान व्यापा-यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन दिले. यात मदनलाल पीचा,अजित पीचा,चंद्रभान गायकवाड, वीरेंद्र बेदमुथा, संपत पीचा, युवराज बागमार, किशोर चोरिडया, मिलिंद श्रीश्रीमाळ,चंद्रकांत वालझाडे,मिलिंद शहा,सुवलाल मोदी,महेश शहाणे,प्रमोद बेदमुथा आदींचा समावेश होता.