प्रतिबंधित क्षेत्रात मुक्तसंचारास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 11:24 PM2020-07-10T23:24:30+5:302020-07-11T00:19:20+5:30
शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रदेखील वाढत आहेत. परंतु हॉटस्पॉट ठरलेल्या भागात मनाई असताना नागरिक मुक्तसंचार करीत असतात. यामुळे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांच्या शुक्रवारी (दि.१०) संयुक्त दौºयात हा निर्णय घेण्यात आला.
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रदेखील वाढत आहेत. परंतु हॉटस्पॉट ठरलेल्या भागात मनाई असताना नागरिक मुक्तसंचार करीत असतात. यामुळे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांच्या शुक्रवारी (दि.१०) संयुक्त दौºयात हा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे हॉटस्पॉट ठरलेल्या भागात नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि रुग्णसंख्या आटोक्यात यासाठी आता वाढीव पोलिसांची रसद महापालिकेला मिळणार आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरात दिवसाकाठी दोनशे रुग्ण आढळू लागले आहेत. काही भागात विशेषत: दाट वस्तीत रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अशा हॉटस्पॉट भागाचा संपूर्ण परिसरच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या प्रतिबंधित क्षेत्रातील न्संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना केल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र, तसे होताना दिसत नसल्याने आता प्रतिबंधित क्षेत्रातून नागरिक बाहेर पडल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. या दौºयात नगरसेवक जगदीश पवार, पोलीस उपआयुक्त अमोल तांबे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, डॉ. कल्पना कुटे जयश्री सोनवणे, विवेक धांडे, स्वप्नील मुदलवाडकर, महेंद्र पगारे यांच्यासह अन्य अधिकारी सहभागी झाले होते.
तर कलम १८८ अन्वये कारवाई !
प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांनी घराबाहेर पडण्यास आणि या भागात येण्यास मज्जाव असून, त्याची काटेकार अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गर्दी केल्यास कलम १८८ अन्वये कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. आरोग्य सेवकांच्या सुरक्षिततेविषयीदेखील यावेळी चर्चा करण्यात आली.
प्रतिबंधित क्षेत्रासाठी वाढीव पोलीसदेखील नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात औषध फवारणी करणे, रहिवाश्यांना असेर्निक गोळ्यांचे वाटप करण याबाबत आढावा घेण्यात आला. तसेच शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांना वाहनांमधून सूचना देण्याचे ठरविण्यात आले आहे.
जागेची पाहणी
शुक्रवारी (दि.१०) महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी फुलेनगर, जुने नाशिक, सारडा सर्कल,महेबूबनगर, गोसावीवाडी तसेच नियोजित कोविड सेंटर असलेल्या पंडित कॉलनीतील माहेश्वरी व जैन ओसवाल बोर्डिंगच्या जागेची पाहणी केली. यावेळी याबाबत चर्चा करण्यात आली.