विमा कर्मचाऱ्यांकडून शासकीय धोरणांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:36 AM2019-01-08T00:36:46+5:302019-01-08T00:37:18+5:30
राज्यात सरकारी कर्मचाºयांची तीन लाख पदे रिक्त असून, यातील अनेक जागांवर कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत.
नाशिक : राज्यात सरकारी कर्मचाºयांची तीन लाख पदे रिक्त असून, यातील अनेक जागांवर कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. या कर्मचाºयांना कायम करण्याविषयी सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. असे असताना ७२ हजार जागांवर नव्याने कर्मचारी भरती करण्याची घोषणा करून सरकारने केवळ निवडणुकीच्या तोंडावर सर्वसामान्य जनतेला गाजर दाखविण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप करीत आयटक आणि सीटू संघटनांच्या पदाधिकाºयांनी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कामगार संघटनांच्या दोनदिवसीय संपाच्या पार्श्वभूमीवर विमा कर्मचारी संयुक्त कृती समितीतर्फे सोमवारी
(दि. ७) गडकरी चौकातील कार्यालय परिसरात द्वारसभा घेण्यात आली. यावेळी उपस्थित कर्मचाºयांनी घोषणाबाजी करत शासकीय धोरणांचा निषेध व संपात सहभागी होण्याचा निर्धार केला. सरकार मूठभर लोकांच्या फायद्यासाठी लाखो कामगारांचा बळी देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी विमा कर्मचारी संयुक्त कृती समितीचे करुणासागर पगारे, संजय कोकाटे, मोहन देशपांडे, शेखर मोघे, आदित्य तुपे आदी उपस्थित होते.
सीटूचे प्रदेशाध्यक्ष डॉ. डी. एल. कºहाड, आयटकचे सरचिटणीस राजू देसले यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करीत मंगळवारपासून संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. डी. एल. कºहाड म्हणाले, कामगार, कर्मचारी संघटना आपल्या मागण्यांसाठी विभक्त लढत आहे.