सिन्नरच्या महिलांकडून कठुआ घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:15 AM2018-04-26T00:15:29+5:302018-04-26T00:15:29+5:30

जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षीय लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महिलांनी तहसीलदार कार्यालयात मोर्चा काढून निषेधाचे निवेदन तहसीलदारांना दिले.

Prohibition of the Kadua incident from Sinnar women | सिन्नरच्या महिलांकडून कठुआ घटनेचा निषेध

सिन्नरच्या महिलांकडून कठुआ घटनेचा निषेध

Next

सिन्नर : जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षीय लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महिलांनी तहसीलदार कार्यालयात मोर्चा काढून निषेधाचे निवेदन तहसीलदारांना दिले.  शहरस्तरीय संघाच्या अध्यक्ष निलोफर सय्यद व महिला सदस्य यांनी बुधवारी दुपारी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन दिले. देशात दिवसेंदिवस लहान मुली व महिला यांच्यावरील अत्याचार वाढत असून, याबाबत कडक कायदा केला पाहिजे.  दोषी व्यक्तीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. या मोर्चात शहरातील लहान मुले व महिलांनी सहभाग घेतला.

Web Title: Prohibition of the Kadua incident from Sinnar women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.