मातोरी अत्याचाराचा कृती समितीकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 01:52 PM2020-01-17T13:52:48+5:302020-01-17T13:55:22+5:30
मातोरी येथील दोन निरपराध तरुणांना अमानुषपणे मारहाण करुन, त्यांच्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तिंवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यासाठी अत्याचार विरोधी कृती समितीतर्फे निदर्शने करण्यात आली
नाशिक : मातोरी येथील दोन निरपराध तरुणांना अमानुषपणे मारहाण करुन, त्यांच्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तिंवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यासाठी अत्याचार विरोधी कृती समितीतर्फे शुक्रवारी (दि.१७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली. तसेच विविध घोषणा देत या प्रकरणातील सर्व दोषी व्यक्तिंवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
मातोरी येथे एका फार्महाऊसवर वाढदिवसासाठी डिजे वाजविण्यासाठी गेलेल्या तरुणांवर तेथील काही नराधमांनी त्यांना अमानुष मारहान करुन त्यांच्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार केला. डीजेवर काम करणाºया तरुणांनी रात्री १० नंतर डिजे वाजविण्यास नकार दिल्याने तसेच इतर काही कारणांमुळे मद्यधुंद असलेल्या या नराधमांनी कायद्याचे उल्लंघन करत हवेत गोळीबार करुन त्यांना धमकाविण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांना रात्रभर अमानुष मारहान करुन जातीयवादी छळवणुक केली. त्यामुळे या नराधमांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी तसेच त्यांच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी, तसेच गुन्हेगारांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा, बंदुकीचा वापर केल्यामुळे तसेच गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, तसेच हे प्रकरण सी.बी. आय कडे सोपविण्यात यावे, पिडीतांना कायमस्वरुपी पोलिस संरक्षण देण्यात यावे, तसेच नैताळे येथील चिमकुलीवर बलात्कार करणाºया नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच विविध घोषणा देत या घटनेचा निषेद व्यक्त करण्यात आला. यावेळी नगरसेवक हेमलता पाटील, कृती समितीचे राजेंद्र बागुल, सुरेश मारु, संजय साबळे, प्रकाश पगारे, बाळासाहेब गांगुर्डे, बाळासाहेब शिंदे, राजेंद्र गवारे, प्रकाश पगारे, चंद्रभान पगारे, निशिकांत पगारे, राहुल तुपलोंढे, दिपक डोके आदी उपस्थित होते.