गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:41 PM2017-09-08T23:41:15+5:302017-09-09T00:09:45+5:30
ख्यातनाम पत्रकार गौरी लंकेश यांच्यावर धर्मांध दहशतवाद्यांनी हल्ला करून हत्या केल्याच्या घटनेचा मनमाड येथील सत्यशोधक संघटना, सत्यशोधक युवा संघटना व रिपाइंच्या वतीने मंडल अधिकाºयांना निवेदन देऊन शनिवारी निषेध करण्यात आला. तसेच या घटनेच्या निषेधार्थ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर तोंडाला काळ्या फिती बांधून निदर्शने करण्यात आली.
मनमाड : ख्यातनाम पत्रकार गौरी लंकेश यांच्यावर धर्मांध दहशतवाद्यांनी हल्ला करून हत्या केल्याच्या घटनेचा मनमाड येथील सत्यशोधक संघटना, सत्यशोधक युवा संघटना व रिपाइंच्या वतीने मंडल अधिकाºयांना निवेदन देऊन शनिवारी निषेध करण्यात आला. तसेच या घटनेच्या निषेधार्थ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर तोंडाला काळ्या फिती बांधून निदर्शने करण्यात आली.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी ही समाज प्रबोधनाचे कार्य करणारे थोर विचारवंत डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ.कलबुर्गी यांच्या हत्या धर्मांध अतिरेक्यांनी केल्या असून, त्या खुन्यांना अद्यापही पकडण्यात यश आलेले नाही. निवेदनावर अशोक परदेशी, गंगाभाऊ त्रिभुवन, रामदास पगारे, मनोज गांगुर्डे, अहमद बेग मिर्झा, फिरोज शेख, शकूर शेख, श्रीकांत साळसकर, प्रकाश बोधक, कैलास अहिरे, योगेश निकाळे, महेंद्र वाघ, योगेश म्हस्के, आशिष भंडारी आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षºया आहे. या घटनेचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर तोंडाला काळ्या पट्या बांधून निदर्शने केली. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला उद्ध्वस्त करण्यात येत असल्याबद्दल या वेळी चिंता व्यक्त करण्यात आली.