नांदूरशिंगोटेत फलक फाडल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 05:39 PM2018-10-26T17:39:43+5:302018-10-26T17:40:02+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचा फोटो असलेला फ्लेक्स फाडल्याने गावात सर्वपक्षीय व समर्थकांनी निषेध व्यक्त केला. यावेळी निषेधाचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांना देण्यात आले.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचा फोटो असलेला फ्लेक्स फाडल्याने गावात सर्वपक्षीय व समर्थकांनी निषेध व्यक्त केला. यावेळी निषेधाचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांना देण्यात आले.
मंगेश लक्ष्मण शेळके व कार्यकर्त्यांनी याबाबत वावी पोलीस ठाण्यात अज्ञात समाजकंटकांविरोधात तक्र ार दाखल केली आहे. येथील रेणुकामाता मंदिर परिसरात वाढिदवस व विविध कार्यक्र म होणार असल्याचा फलक आयोजकांनी लावला होता. सदर फलकावर माजी आमदार कोकाटे यांच्यासह विविध मान्यवरांचे फोटो होते. अज्ञात समाजकंटकांने फलकावर असलेल्या कोकाटे यांचा फोटो फाडल्याचे तक्रारी अर्जात म्हटले आहे. संबंधित अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी समर्थकांनी निषेध व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे.
सदर घटनेची तातडीने दखल घेत वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी नांदूरशिंगोटे येथे धाव घेतली. समर्थकासह त्यांनी घटनेची पाहणी करून नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्रात शांतता समितीची बैठक घेतली. यावेळी बाजार समतिीचे संचालक लक्ष्मण शेळके, सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच भारत दराडे, विनायकराव शेळके, दीपक बर्के, कैलास बर्के, संजय आव्हाड, तुकाराम मेंगाळ, संदीप शेळके, निवृत्ती शेळके यांच्यासह गावातील पदाधिकारी उपस्थित होते.
गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, यापुढे गावात सार्वजनिक कार्यक्रमाचे फलक लावतांना ग्रामपंचायतीची परवानगी घेण्याचे आवाहन बोरसे यांनी केले. सर्व जाती धर्माचे लोक येथे राहत असून हे गाव मध्यवर्ती ठिकाणी असल्याने राजकीय दृष्टीने अत्यंत जागरूक असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत ग्रामपंचायतीला काही नियामवली देण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी करावी असेही त्यांनी सांगितले. फलक फाडण्याचा प्रकार चुकीचा असून पोलीस प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच गोपाळ शेळके यांनी यावेळी निषेध केला.
यावेळी अनिल सहाणे, सुदाम आव्हाड, संजय आव्हाड, तुकाराम मेंगाळ, रमेश शेळके, दत्तात्रय मुंगसे, अशोक गवारे,दत्तू शेळके, गणेश घुले, संजय शेळके, संदीप मुंगसे, अरु ण शेळके, अक्षय शेळके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.