श्रावणातील धार्मिक विधीला मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 09:15 PM2020-07-23T21:15:28+5:302020-07-24T00:16:37+5:30

त्र्यंबकेश्वर : व्रत वैकल्याचा शिव उपासनेचा श्रावण महिन्यात कोरोनामुळे धार्मिक विधीसह ब्रह्मगिरी फेरीवरही जिल्हा प्रशासनाने बंदी केली आहे. अनेक भाविक या महिन्यात देव देवतांचे दर्शन घेण्यासाठी येतील तसेच श्रावणी सोमवार व विशेषत: तिसऱ्या सोमवारच्या पाशर््वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Prohibition of religious rites in Shravan | श्रावणातील धार्मिक विधीला मनाई

श्रावणातील धार्मिक विधीला मनाई

Next

त्र्यंबकेश्वर : व्रत वैकल्याचा शिव उपासनेचा श्रावण महिन्यात कोरोनामुळे धार्मिक विधीसह ब्रह्मगिरी फेरीवरही जिल्हा प्रशासनाने बंदी केली आहे. अनेक भाविक या महिन्यात देव देवतांचे दर्शन घेण्यासाठी येतील तसेच श्रावणी सोमवार व विशेषत: तिसऱ्या सोमवारच्या पाशर््वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या आदेशात म्हटले आहे की, सध्या जगभर कोरोना कोव्हीड -१९ या महामारीचे थैमान सुरु आहे. भारत देशात महाराष्ट्र एक नंबरला कोरोना बाधितांचा नंबर आहे. त्र्यंबकेश्वर हे तिर्थक्षेत्र महाराष्ट्रातील गर्दीचे ठिकाण म्हणुन ओळखले जाते. साहजिकच येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होउन गर्दी झाल्यास कोरोनाचे संक्र मण मोठ्या प्रमाणात होईल. हा धोका ओळखुन इगतपुरी त्र्यंबकचे उपविभागिय तथा प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी प्रशासकीय अधिकारी त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त नगरपरिषद मुख्याधिकारी आदीं सह एका संयुक्त बैठकीचे आयोजन श्री त्र्यंबकेश्वर मंदीराच्या प्रांगणात केले होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक भिमाशंकर ढोले, तहसिलदार दीपक गिरासे, मुख्याधिकारी संजय जाधव, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, सां.बा. विभागाचे उपअभियंता पांडुरंग सोनवणे, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्थ तथा पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी, दिलीप तुंगार आदी उपस्थित होते.
यापुर्वीच ३१ जुलै पर्यंत लॉक डाऊन वाढविण्यात आले आहे. राज्यात कोरोनाचा बससेवा बंद आहे. तरीही खाजगी वाहनाने त्र्यंबकेश्वर येथे येउ नये, अत्यंत महत्वाचे काम असल्या शिवाय वाहनाचा उपयोग बाहेर जाण्यासाठी शहरात येण्यासाठी करु नये, असे आवाहन त्र्यंबकेश्वर येथील बैठकीत करण्यात आले़
गावात शुकशुकाट
त्र्यंबकेश्वर मंदीर बंद असल्याने गावात शुकशुकाट असून त्या अनुषंगाने देवदेवतांना करण्यात येणारे धार्मिक विधी ब्रम्हगिरी प्रदक्षिणा करु नये. हा आदेश उपविभागिय दंडाधिकारी तेजस चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.

Web Title: Prohibition of religious rites in Shravan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक